पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसचे संकट सर्वात प्रथम ओळखून त्यावर उपाययोजना सुरू केल्या. जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. पंतप्रधानांनी जनतेमध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण केली. याचा प्रत्यय आता विविध जागतिक संस्थांकडून होणाऱ्या सर्व्हेमधूनही येत आहे. जगात सर्वाधिक आशावादी भारतीय असून अर्थव्यवस्था २-३ महिन्यांत पुन्हा रुळावर येईल, असा विश्वास ५७ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसचे संकट सर्वात प्रथम ओळखून त्यावर उपाययोजना सुरू केल्या. जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. पंतप्रधानांनी जनतेमध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण केली. याचा प्रत्यय आता विविध जागतिक संस्थांकडून होणाºया सर्व्हेमधूनही येत आहे. जगात सर्वाधिक आशावादी भारतीय असून अर्थव्यवस्था २-३ महिन्यांत पुन्हा रुळावर येईल, असा विश्वास ५७ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे.
मॅकेंझी अँड कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ५७ टक्के लोकांनी पंतप्रधानांनी केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा २-३ महिन्यांपूर्वी होती तशी होईल, असा विश्वास व्यक्त केला. असेच इप्सॉसच्या सर्व्हेक्षणात ६३% भारतीयांना लवकरच अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची आशा आहे. म्हणजे ५ पैकी ३ भारतीय भविष्याबाबत आशावादी आहेत.
दैनंदिन आयुष्याविषयी भारतीय जास्त आशावादी आहोत. मॅकेंझीच्या या सर्वेक्षणात केवळ ७ टक्के लोकांनी जनजीवन सुरळीत होण्यासाठी एक वर्ष लागेल असे सांगितले. उर्वरित ९३ % लोकांनुसार, एक वर्षाच्या आत जीवनमान पूवीर्सारखे होईल. ८% लोकांना वाटते, एक महिन्यात पूर्ववत होईल, तर महामारी ऑगस्ट किंवा ऑक्टोबरपर्यंत राहू शकते, असे ३२ % लोकांचे मत होते.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार, भारतात लोक खर्च वाढवण्याची तयारी करत आहेत. याच प्रकारचा ट्रेंड चीन, इंडोनेशिया व नायजेरियामध्ये बघायला मिळाला. तर अमेरिका, रशिया, जर्मनीसारख्या अनेक देशांमध्ये लोक खर्च कमी करण्याचे नियोजन करत आहेत. कॅपजेमिनी रिसर्च इन्स्टिट्युटच्या सर्वेक्षणानुसार, ५७ % भारतीय यावर्षी कार घेण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App