पंतप्रधानांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जोडले हात

चीनी व्हायरसविरुध्द लढा देत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, कोविड-19 संकटाविरोधातील लढ्याचे निर्भयपणे नेतृत्व करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांंना पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करूया.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसविरुध्द लढा देत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, कोविड-19 संकटाविरोधातील लढ्याचे निर्भयपणे नेतृत्व करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करूया.

पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणतात, आज जागतिक आरोग्य दिन. जागतिक स्तरावरील समस्या आणि त्यावर उपाय काढण्यासाठी ७ एप्रिल १९५० सालापासून जागतिक आरोग्य संघटनेनं आजचा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून घोषित केला. सपोर्ट नर्सेस एँन्ड मिडवाइस म्हणजेचं परिचारिका आणि दायींना आधार ही या वषार्ची संकल्पना आहे.या वर्षीच्या आरोग्य दिनी जगावर कोरोना विषाणूचं संकट घोंघावत आहे. या संकटाशी लढा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोकं अहोरात्र झटत आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त उत्तम आरोग्य आणि कल्याणाची प्रार्थना करण्याबरोबरच कोविड-१९ महामारीशी लढा देण्यात अगस्थानी असलेले डॉक्टर, परिचारीका, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाºयांप्रति आपली कृतज्ञता पुन्हा व्यक्त करुया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सोशल डिस्टन्सिंग यासह इतर सुचनाचं पालन करुन, आपल्या बरोबरच इतराचंही आयुष्य वाचवुया असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आपल्या वैयक्तीक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी हा दिवस आपल्याला प्रेरणा देईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात