अमेरिकेसह अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध पुरविण्यावरून विरोधकांकडून होणार्या टीकची पर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाही. चीनी व्हायरस विरोधातील लढ्यात मानवतावादी भूमिका घेत तब्बल ५५ देशांना ही संजीवनी पोहोचविली. पंतप्रधानांच्या या मानवतावादी भूमिकेला संयुक्त राष्ट्रसंघानेही सलाम केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेसह अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध पुरविण्यावरून विरोधकांकडून होणार्या टीकची पर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाही. चीनी व्हायरस विरोधातील लढ्यात मानवतावादी भूमिका घेत तब्बल ५५ देशांना ही संजीवनी पोहोचविली. पंतप्रधानांच्या या मानवतावादी भूमिकेला संयुक्त राष्ट्रसंघानेही सलाम केला आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी इतर देशांना मदत करणार्या देशांना सलाम करत त्यांचे कौतुक केले आहे. यामध्ये भारताचे नाव अग्रक्रमावर आहे. भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केले आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध चीनी व्हायरसवर प्रभावी ठरु शकते असा अंदाज असून अमेरिकेत त्याची पडताळणी केली जात आहे. अमेरिकेतील १५०० रुग्णांवर या औषधाचा वापर केला जात आहे. अमेरिकेनंतर इतर देशांनीही भारताकडे आम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत गरजेसाठी पुरेसा साठा असल्याची खात्री झाल्यानंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या नियार्तीवरील बंदी उठविली. अँटोनियो ग्युटेरेस याबाबत बोलताना म्हणाले, चीनी व्हायरसशी लढा देण्यासाठी सर्व जगात एकता निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक देश जो मदत करण्यास समर्थ आहे त्याने इतर देशांना मदत केली पाहिजे. जे अशी मदत करत आहेत त्यांना आमचा सलाम आहे. भारत इतर देशांना औषधांचा पुरवठा तसेच इतर मदत पुरवत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App