पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकजचे मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी अािण देशभरातील नेत्यांनी स्वागत केले आहे. यामुळे संकटाच्या परिस्थितीत भारतीयांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकजचे मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी अाणि देशभरातील नेत्यांनी स्वागत केले आहे. यामुळे संकटाच्या परिस्थितीत भारतीयांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, अटल निर्भर भारत अभियानामुळे मध्यमवर्ग, शेतकरी आणि कामगारांचे जीवन सुसह्य होणार आहे. या पॅकेजमुळे आर्थिक संकटावर मात करण्याचे लक्ष्य आम्ही पूर्ण करू शकणार आहोत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने पंतप्रधांचे आभार मानले आहेत. जागतिक महामारीच्या या संकटात पंतप्रधानांनी भारताला ज्या पध्दतीने पुढे नेण्याचा प्रयत्न चालविला आहे ते संपूर्ण जगासाठी रोल मॉडेल बनेल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, हे विशेष आर्थिक पॅकेज भारतामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण कील. १३० कोटी जनतेच्या मनात यामुळे विश्वास आणि भरोसा निर्माण झाला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, आत्मनिर्भरता, आत्मबल और आत्मविश्वास ही भारताची खरी ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने देशातील १३० कोटी जनता खांद्याला खांदा लावून या संकटाचा मुकाबला करेल आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत होईल.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे बलशाली भारताच्या अभियानाला नवीन गती मिळेल. पंतप्रधानांनी देशातील धमिक, शेतकरी आणि मध्यम वर्गाच्या प्रति असलेली त्यांची बांधिलकी दाखवून दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकरी, मध्यम वर्ग, सामान्य माणूस आणि उद्योग यासारख्या प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल खूप धन्यवाद.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App