अमेरिकेसह इतर देशांना चीनी व्हायरसच्या उपचारासाठी भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधे पुरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे भारतातील पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. देशांतर्गत उपयोगासाठी मुबलक प्रमाणात औषधांचा साठा आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : अमेरिकेसह इतर देशांना चीनी व्हायरसच्या उपचारासाठी भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामुळे भारतातील पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. देशांतर्गत उपयोगासाठी मुबलक प्रमाणात औषधांचा साठा आहे. असे असूनही काही घटकांनी अपुर्या माहितीच्या आधारे जाणिवपूर्वक कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून, कर्तव्यभाव बाळगून हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन इतर देशांनाही पुरविण्यास सुरूवात केली. मात्र, यानंतर काही माध्यमांनी भारतातील पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे पसरविणे सुरू केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
भारतातील उपयोगासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनच्या ३ कोटी २८ लाख गोळ्या आहेत. भारताची सध्याची गरज १ कोटी गोळ्यांची आहे. त्याचबरोबर गोळ्यांचे उत्पादनही सुरू आहे. त्यामुळे नवीन साठाही निर्माण होत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईत साठा संपल्याचे पसरविले जात आहे. येथेही ३४ लाख गोळ्या उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे अकारण अफवा पसरवणे किंवा शंका निर्माण करणे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशहिताची योग्य काळजी घेतल्यानंतरच इतर देशांना मदतीचा हात दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App