भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपली बलशाली निवडणूक यंत्रणा आता स्थलांतरीत मजुरांच्या सुविधांसाठी वापरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहार भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक घेऊन सर्व मंच आणि मोर्चांची पुर्नरचना करण्याचे आदेश दिले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपली बलशाली निवडणूक यंत्रणा आता स्थलांतरीत मजुरांच्या सुविधांसाठी वापरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहार भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक घेऊन सर्व मंच आणि मोर्चांची पुर्नरचना करण्याचे आदेश दिले आहे.
चीनी व्हायरसचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जनतेला मदत करण्यासाठी भाजपाची सगळी यंत्रणा कामाला लावण्याचे ठरविले आहे. यासाठी नड्डा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी तातडीने करण्यास सांगितले आहे. या माध्यमातून स्थलांतरीत मजुरांना सकुशल घरी पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्यास सांगितले.
नड्डा यांनी बुथस्तरावर सप्तर्षी मंडळाच्या नियुक्तीची प्रक्रिया ३० मे पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये सामाजिक समीकरण सांभाळावे, असेही सांगितले आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात राहावे, असे नड्डा यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबुक, टेलीग्राम, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकार करत असलेल्या मदतीची माहिती द्यावी. २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून नागरिकांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असेही नड्डा यांनी सांगितले.
या व्हिडीओ कॉन्फरन्सचे संचालन बिहार भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केले. या कॉन्फरन्समध्ये राष्ट्रीय संघटन महामंत्री बीएल संतोष, सौदान सिंह, प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल, उप मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, नित्यानंद राय, राष्ट्रीय उपाध्यक्ष रेणु देवी, पूर्व केंद्रीय मंत्री डॉ. सीपी ठाकुर, राधा मोहन सिंह, मंत्री नंद किशोर यादव, प्रेम कुमार, मंगल पांडेय, बिहार के संगठन महामंत्री नागेंद्र नाथ, सह संघटन महामंत्री शिवनारायण महतो सहभागी झाले होते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App