विशेष प्रतिनिधी
पुणे : निजामुद्दीन येथील तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्याला पुणे विभागातून 182 जण गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील 106 जणांचा शोध लागला असून उर्वरित मुस्लिमांना शोधले जात आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी ही माहिती दिली.
डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, निजामुद्दीन येथील धार्मिक मेळाव्याला पुणे विभागातील 182 जण गेले असल्याची यादी प्रशासनाला मिळाली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 21 मुस्लिमांचा समावेश आहे. या माहितीची छाननी करतांना काही नावे दुबार आढळली. तसेच प्राप्त माहितीनुसार 7 व्यक्ती अतिरिक्त असल्याचे दिसले. दरम्यान यातल्या 106 जणांचा शोध लागला असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10,ल तर काहीजण सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातले आहेत. त्यातील 94 जणांना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेतले जातील. हा अहवाल मिळल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील 51 जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App