नाशिककरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; कठोर कारवाईची हीच ती वेळ

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिककरांना कोरोना फैलावाचे गांभीर्य नाही. देशभर १४४ कलम लागू आहे. लॉक डाऊन सुरू आहे. वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री पोटतिडकीने कोरोनाचे गांभीर्य समजवत आहेत आणि नाशिककर निष्काळजीपणाने रस्त्यावर आणि बाजारत फिरत आहेत. कालचे आणि आजचे हे चित्र आहे. पोलिस मर्यादित स्वरूपात कारवाई करत आहेत पण नाशिककरांनी स्वयंशिस्तच पाळण्याची सर्वाधिक गरज आहे. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीने बाजार भरवला, शहरामधल्या मंडया सुरू होत्या. त्यांना पोलिस प्रशासनाने नोटिसा पाठवल्या. एका आयटी कंपनीत दोन हजार कर्मचारी काम करतात. त्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. पण कर्मचारी कार्यालयात जाऊनच काम करत होते. त्यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली. प्रतिबंधात्मक उपाय धुडकावत नाशिककरांनी एक प्रकारे कायदाच हातात घेतला आहे. आता कठोर कारवाईची हीच ती वेळ आली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात