विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाब मलिक यांची बहिण कुर्ल्याच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी आपल्या प्रभागात सँनिटायझर ऐवजी पाणी फवारणी केली आहे. त्याचा विडिओ देखील व्हायरल झाला आहे. एकीकडे सगळा देश चिनी व्हायरस कोविड १९ विरोधातील लढाई एकजुटीने लढत असताना नबाब मलिक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दुगाण्या झोडतात तर दुसरीकडे त्यांची नगरसेविका बहिण स्वत: डॉक्टर असूनही लोकांची सँनिटायझरच्या नावाखाली पाणी फवारून फसवणूक करीत आहे. चिनी व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कुर्ल्याच्या प्रभागात सँनिटायझर फवारणी केली जात होती. सँनिटायझर फवारणीचे काम महापालिका करते. मात्र सँनिटायझरच्या कंटेनरवर डॉ. सईदा खान यांचे पोस्टर लावण्यात आले होते. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला संशय आला. त्याने कंटेनरमधील द्रव्याची तपासणी केली असता त्यात पाणी भरल्याचे आढळून आले. परिसरात सँनिटायझर म्हणून त्या पाण्याचीच फवारणी करण्यात येत होती. या सर्व घटनेचे विडिओ चित्रीकरण करण्यात आले. हा विडिओ व्हायरल झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App