नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधी आंदोलनात भडकाऊ भाषण करून मुस्लिमांना चिथावणी देणारा आणि शाहीन बाग मॉडेलने देशभर चक्का जाम करू इच्छिणाऱ्या शरजील इमामविरोधात पोलीसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. चिथावणीखोर भाषण देऊन हिंसा घडवल्याचा आरोप शरजीलवर आहे. शाहीन बाग येथील आंदोलनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा मोठा कट आखला गेला होता. सीएए कायद्याविरोधात लोकांमध्ये भ्रम पसरवणारी मोठी यंत्रणा या निमित्ताने देशभर कामाला लावण्यात आली होती. या कटाचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. चिनी विषाणूच्या उद्रेकामुळे देशात असंतोष निर्माण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली होती.
खास प्रतिनिधी
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधात आंदोलनात भडकाऊ भाषण करून मुस्लिम समाजाला चिथावणी देणारा आणि शाहीन बाग मॉडेलने देशभर चक्का जाम करू इच्छिणाऱ्या शरजील इमामविरोधात पोलीसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. चिथावणीखोर भाषण देऊन हिंसा घडवल्याचा आरोप शरजीलवर ठेवण्यात आलेला आहे.
सीएए आंदोलनातले शरजीलचं एक भाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. 15 डिसेंबर 2019 रोजी जामिया मिलीया येथे शरजीलने एक चिथावणीखोर भाषण केलं होतं. ज्यात इशान्येकडील राज्य भारतापासून तोडण्याची भाषा वापरण्यात आली होती. याच भाषणाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी शरजील विरोधात हिंसा घडवण्यास कारणीभूत आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनादरम्यान अलिगढ मुस्लिम विद्यापीठात हिंसाचार झाला होता, याहीवेळी शरजीलने चिथावणीखोर भाषण केलं होतं. शरजील हा बिहारमधील जहानबादचा रहिवासी आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीजमध्ये तो शिक्षण घेत आहे.
नागरिकत्व कायद्याविरुद्ध शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी नेता शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. शरजीलच्या फेसबुक प्रोफाइलच्या मते त्याने आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्समधूस पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये शरजील आसामला भारतापासून वेगळे करण्याचे आवाहन करत होतो. त्यामध्ये तो म्हणत होता की आसामला भारतापासून तोडून वेगळे केले तरच भारत आपले एकेल. आसाममध्ये मुसलमानांची अवस्था काय आहे? तुम्हाला माहित आहे का? या ठिकाणी एनआरसी लागू झाला आहे. मुसलमानांना डिटेंशन कॅम्पमध्ये टाकले जात आहे. सात-आठ महिन्यांनी समजेल की येथील सगळ्या बंगालींना ठार केले आहे. त्यासाठी आपल्याला आसामची मदत करावी लागेल. आसामला जाणारा रस्ता बंद करावा लागेल. शाहीन बाग येथील आंदोलनाचा मुख्य आयोजकही शरजील होता असे बोलले जाते.
आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये शरजीलने लिहिले होते की शाहीन बागचे मॉडेल हे चक्का जाम करण्याचे आहे. बाकी सगळे दुय्यम आहे. चक्का जाम आणि धरणे आंदोलनातील फरक समजून घ्या. प्रत्येक शहरात धरणे आंदोलन करा. त्यामध्ये लोकांना चक्का जाम आणि धरणे आंदोलनाचा फरक सांगा. त्यानंतर तयारी करून मुख्य रस्त्यांवर चक्का जाम करा. दोन जानेवारी रोजी एका पोस्टमध्ये लिहिले होते की हॉँगकॉगच्या धर्तीवर गर्दी गोळा करायला हवी. राम मंदिराचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्याने ‘न्याय नाकारला’ (जस्टीस डिनाईड) नावाने मोहीमही चालविली होती. बाबरी मशीद प्रकरणी मुस्लिमांना न्याय मिळाला नाही, असे सांगून न्यायालयीन निकालानंतरही तो मुसलमानांना भडकवण्याचा प्रयत्न करत राहिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App