सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणाबद्दल विरोधकदेखील ज्यांचे खुलेपणाने कौतुक करतात त्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केले जात आहे. या ट्रोलधाडांना रोखण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केले जात आहे. या ट्रोलधाडांना रोखण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा परमबीर सिंह यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले,सोशल मीडियावर बदनामी कारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे, तसंच अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळांने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
राज्यपालांच्या टोपीवर वक्तव्य केल्यानंतरही जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे गंभीर असून पोलीस दुजाभाव करत असल्याचा आमचा आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट नसतानाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून हे सरकार सुडाचं राजकारण करतंय का अशी शंका निर्माण होत आहे.
काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील हेही आम्ही नम्रपणे सांगितले आहे. पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तात्काळ एफआयआर केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याबाबतही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत. फडणवीस यांच्या वक्तव्यांवरूनही काही जण त्यांना ट्रोल करतात. अत्यंत अश्लिल पध्दतीने कॉमेंट केली जात आहेत, असे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App