तबलिगी जमातीचा म्होरक्या मौलाना सादची टगेगिरी चालूच आहे. फरार असल्याने पोलीस शोध घेत असताना त्याने एका चॅनलला मुलाखत दिली. आपण चीनी व्हायरसची टेस्ट करून घेतली असून पोलीसांना आपला ठावठिकाणा माहित असल्याची मुक्ताफळेही त्याने उधळली आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिगी जमातीचा म्होरक्या मौलाना सादची टगेगिरी चालूच आहे. फरार असल्याने पोलीस शोध घेत असताना त्याने एका चॅनलला मुलाखत दिली. आपण चीनी व्हायरसची टेस्ट करून घेतली असून पोलीसांना आपला ठावठिकाणा माहित असल्याची मुक्ताफळेही त्याने उधळली आहेत.
दिल्ली पोलिस तबलिगी जमातचा स्वयंघोषित अध्यक्ष मौलाना साद याच्या मागावर आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही घातले आहेत.
परंतु, ‘दिल्ली पोलिसांना माझा ठावठिकाणी ठावूक आहे’ असे खुद्द मौलाना साद यानं एका चॅनलशी बोलताना म्हटलंय. पोलिसांनी मला करोना टेस्ट करण्यास सांगितलं होतं तीदेखील मी केलीय, असाही खुलासा सादनं केलाय. पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं मला दोन वेळा नोटीस पाठवलीय. मी त्याला उत्तरही दिलंय. माज्या मुलगा घरात उपस्थित असताना गुन्हे शाखेनं घराची झडती घेतली. पोलिसांनी मला कोरोना टेस्ट करायला सांगितली. तीही मी केली. परंतु, अद्याप रिपोर्ट आलेला नाही.
टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाला देण्यात येईल. पोलिसांनी जे काही सांगितलंय त्या सर्व नियमांचं आम्ही पालन करत आहोत, असं आपल्या मुलाखतीत मौलाना साद यानं म्हटलंय.
आम्ही लॉकडाऊन दरम्यान मरकझमध्ये कुणालाही आमंत्रित केलं नव्हतं. आमचे सगळे कार्यक्रम २३ मार्च रोजी म्हणजेच लॉकडाऊनपूर्वीच रद्द करण्यात आले होते. परंतु, अनेक तबलीगी जमातचे कार्यकर्ते अगोदरच मरकझमध्ये उपस्थित झाले होते. अचानक लॉकडाऊन लागू झाल्यानं ते आपल्या घरी जाऊ शकले नव्हते, असा खुलासाही सादनं केलाय.
मौलाना सादच्या उत्तर प्रदेशात शामली जिल्ह्यात कांधला येथील फार्म हाऊसवर छापा गुरूवारी पोलीसांनी छापा टाकला होता. या फार्म हाऊसवर कोणी लोक वास्तव्यास आहेत का, याचीही तपासणी करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App