देशातील चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईला निजामुद्दीन मरकझ प्रकरणामुळे मोठा धक्का बसला अशी स्पष्टोक्ती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली. देशाने काही निर्णय घेतला तर सर्व समाजाने त्याचे पालन करायचे शिस्ततबध्दपणे करायला पाहिजे, हा धडा या निमित्ताने मिळाला, असेही त्यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईला निजामुद्दीन मरकझ प्रकरणामुळे मोठा धक्का बसला अशी स्पष्टोक्ती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली. देशाने काही निर्णय घेतला तर सर्व समाजाने त्याचे पालन करायचे शिस्ततबध्दपणे करायला पाहिजे हा धडा या निमित्ताने मिळाला, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी डॉ. हर्ष वर्धन यांची ऑनलाईन मुलाखत घेतली. या वेळी ते बोलत होते. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, आता पुन्हा या मुद्यावर चर्चा करण्यात काही स्वारस्य नाही. कारण दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ प्रकरणाशी संबंधित सर्व जणांची चौकशी झाली. जेवढे बाधित झाले होते त्या सर्वांवर उपचार झाले आहेत. परंतु, तरीही एक गोष्ट मान्य केली पाहिजे की यामुळे देशाला खूप मोठा झटका बसला.
जेव्हा दहा लोकांनाही एकत्र जमण्याची परवानगी नव्हती, त्यावेळी हजारांहून अधिक लोक मरकझमध्ये एकत्र जमले. अनेक दिवस एकत्र राहिले. त्यामध्ये अनेक परदेशी नागरिकही होते. सरकारला याची माहिती मिळाल्यावर सर्वांची तपासणी करण्यात आली. देशभर पसरलेल्या तबलिगींचा शोध घेण्यात सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग (आयटी) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे योगदान खूप महत्वाचे होते.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, स्थलांतरीत मजुरांचे जाणे-येणे सुरू आहे तोपर्यंत देशात चीनी व्हायरसची प्रकरणे वाढणार आहेत. पुढच्या एक-दोन आठवड्यांत सर्व मजुर आपापल्या घरी पोहोचतील. तेव्हा विषाणू प्रकरणाच्या संक्रमणात सर्वाधिक वाढ होण्याची भीती आहे. परंतु, सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. देशातील आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहे.
देशातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जाईल. सध्या देशात ७० हजार रुग्ण आहेत. मात्र, देशात एका वेळी दहा लाख रुग्ण झाले तरी त्यांच्यावर उपचार करण्यास आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे.
व्हायरसवर उपचारसाठी १४ पैकी चार व्हॅक्सीन लवकरच क्लिनिकल ट्रायलच्या टप्यावर पोहोचणार असल्याचे सांगून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, पुढच्या पाच महिन्यांत त्यांचा रुग्णांच्या उपचारासाठी उपयोग सुरू होईल. संपूर्ण जगातच व्हॅक्सीन शोधण्यासाठी प्रयत्न आहेत. जवळपास १०० व्हॅक्सीनवर संशोधन सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App