चीनी व्हायरसचा धोका पुरुषांना असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्ये 75 टक्के पुरुष आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्येही ७३ टक्के पुरुषच असल्याचे दिसून आले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसचा धोका पुरुषांना असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्ये 75 टक्के पुरुष आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्येही ७३ टक्के पुरुषच असल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंत देशभरात कोविड-१९ चा संसर्ग झालेले पुष्टी झालेले 4067 रुग्ण आढळले आहेत आणि 109 जणांचा मृत्यू झाला आहे. लिंगानुसार केलेल्या वर्गवारीमध्ये 76 टक्के पुरुष आणि 24 टक्के स्त्रिया आहेत वयोमानानुसार केलेल्या वर्गवारीनुसार 47 टक्के लोक 40 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. 34 टक्के लोक हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. 19 टक्के लोक 60 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील आहेत.
कोविड-19 मुळे दगावलेल्या 109 रुग्णांच्या अहवालांचेही विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये 73 टक्के पुरुष आणि 27 टक्के महिला आहेत. त्यांची वयोमानाची वर्गवारी केली असता 63 टक्के मृत्यू जास्त वयोमानाच्या म्हणजे (60 वर्षे आणि त्यावरील) व्यक्तींचे आहेत. 30 टक्के मृत्यू 40 ते 60 या वयोगटातील आहेत. 7 टक्के मृत्यू 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचे आहेत. आतापर्यंत दगावलेल्यांमध्ये 86 टक्के व्यक्तींना मुख्यत्वे मधुमेह, मूत्रपिंडाचे जुनाट आजार, रक्तदाब आणि हृदयरोग असे आजार असल्याचे दिसून आले आहे.
मात्र, पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये जास्त वयोमान असलेल्या रुग्णांचे प्रमाण 19 टक्के होते आणि त्या वयोगटातील 63 टक्के रुग्ण दगावले असल्याने जास्त वयाच्या व्यक्तींना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे. तसेच 60 वर्षांखालील व्यक्तींमध्ये 37 टक्के मृत्यूची नोंद झाली आहे तर सुमारे 86 टक्के मृत्यू विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे असल्यामुळे तरुण वर्ग आणि इतर आजारांच्या समस्या असलेल्यांना देखील या आजाराचा जास्त धोका आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव विविध जिल्ह्यातल्या अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने चर्चा करून राज्यांच्या सर्व भागात सुरू असलेल्या उपाययोजना समान पद्धतीने सुरू राहाव्यात याची दक्षता घेत आहेत. सर्व जिल्ह्यांना कोविड-19 संदर्भात जिल्हास्तरीय व्यवस्थापन योजना सज्ज ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्यांना यापूर्वीच राष्ट्रीय आरोग्य मोहीम(एनएचएस) आणि राज्य आपत्ती मदतनिधी( एसडीआरएफ) यांचा वापर करावा. कोविड-19 प्रादुभार्वाच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व उपाययोजना करण्यासाठी म्हणजे विलगीकरण केंद्रांची, केवळ कोविड-19 वर उपचार देणाºया रुग्णालयांची निर्मिती आणि वैद्यकीय सामग्रीचे उत्पादन, रुग्णांवर उपचार आणि इतर उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त एनएचएमने यापूर्वीच सर्व राज्यांसाठी 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि आज 3000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे. एन-95 मास्क, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई अर्थात वैयक्तिक संरक्षण सामग्री यांची खरेदी केंद्रीय निधीमधून करण्यात येत आहे आणि देशभरातील सर्व राज्यांना त्यांचे वितरण केले जात आहे. कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयालयाने हेल्पलाईन तयार केली आहे. क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री) येथे कोविड- १९ ची माहिती मिळू शकेल. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App