विशेष प्रतिनिधी
पुणे : करोना व्हायरस चीनमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असून, “बायो टेररिझम’साठी तो वापरण्यात येणार होता. मात्र, तो प्रयोगशाळेत लीक झाल्यामुळे वुहान शहरातून त्याचा प्रसार झाला. या बद्दल चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा खटला चालवावा, अशी मागणी पुण्यातील वकील ऋषिकेश सुभेदार आणि आशीष पाटणकर यांनी हेगच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाला पत्र पाठवून केली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरच्या न्यायालयातही क्षी जिंगपिंग यांच्यावर खटला दाखल करून त्याची सुनावणी ११ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा त्रास सर्व जगाला सहन करावा लागतो आहे, असा दावा पुण्यातील दोन्ही वकिलांनी केला आहे. त्याबद्दल चीनचे राष्ट्रप्रमुख म्हणून क्षी जिंगपिंग यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, लोकांच्या जीविताशी निष्काळजीपणे वागणे या गुन्ह्यांखाली आंतरराष्ट्रीय कोर्टाने कारवाई करावी, त्यासाठी एक समिती नेमावी, ऍड. पाटणकर आणि ऍड. सुभेदार यांनी पत्र इंटरनॅशनल कोर्ट हेग आणि युनायटेड नेशन्सला पाठवले आहे. या कोर्टाला पाठवलेले पत्र जनहित याचिकेत त्वरित रुपांतरित करून घ्यावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
मुजफ्फरपूरच्या न्यायालयातील याचिकेतही वरील स्वरुपाचे मुद्दे मांड़ण्यात आले असून त्याची दखल घेत न्यायाधीशांनी ११ एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App