विशेष प्रतिनिधी
चेन्नई शहरातील कोरियन वाणिज्य दूतावास आणि चीनमध्ये असणऱ्या कोरियन कंपन्या यांच्यात प्राथमिक चर्चा चालू झाली आहे. या संबंधीचे वृत्त भारतात अग्रगण्य असलेल्या टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. चीनमध्ये सुरु असणारे प्रकल्प भारतात आणण्यासंबंधीच्या काही चर्चा पुढच्या टप्प्यावर गेल्याचा दावा यात करण्यात आला आहे.
मात्र या प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो, या बद्दल त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. चिनी विषाणूने निर्माण केलेली स्थिती कधी पुर्वपदावर येईल हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. कोरियाच्या या दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची भारताची क्षमता, भारताकडून त्यांना मिळणारे सहकार्य या गोष्टींवरही अनेक बाबी अवलंबून आहेत. कम्युनिस्ट चीनमधून बाहेर आणण्यासाठी कंपन्यांनी दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याचे तज्ञांचे मत आहे.