वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मार्चच्या 25 तारखेला जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन येत्या 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. यामुळे चिनी विषाणूच्या फैलावावर मर्यादा आल्या आहेत. कोरोनाची चाचणी घेण्याचा वेगही याच काळात वाढवला असल्याने कोरोना बाधीतांची संख्याही मोठ्या संख्येने वाढत आहे. यामुळे संशयितांना क्वारंटाईन करणे, बाधीतांवर उपचार करणे याला प्राधान्य देता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे अजूनही कोरोनामुळे भारतात इटली, अमेरिका, स्पेनप्रमाणे मृत्यू झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 3 लाख 3 हजार 576 सॅम्पलची चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी 12 हजार 581 व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चाचण्या घेण्याचे सर्वाधिक प्रमाण देशात महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 56 हजार 673 लोकांची चाचणी घेण्यात आली. यापैकी 3 हजार 202 लोक कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात 194 असून तीनशेपेक्षा जास्त लोक कोरोना विषाणूच्या रोगातून बरे झाले आहेत. या व्यतिरीक्त प्रमुख राज्यांमधल्या चाचण्यांची स्थिती पुढीलप्रमाणे –
सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी कोविड -19 च्या सामुदायिक तपासणी करण्यासाठी व्यापक चाचण्या करण्याचे आवाहन केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या चाचणी धोरणाची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. यापुढे इन्फ्लूएन्झासारख्या आजाराने ग्रस्त सर्व लक्षणांच्या रुग्णांची चाचणी घेतली जाईल. ताप, खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची चाचणी होईल. हॉटस्पॉट्स / क्लस्टरमध्ये चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती, संशयित किंवा बाधीतांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, रोगनिदान करणारे आरोग्यसेवक, कोरोना विषाणूची लक्षणे असणारे, गंभीर तीव्र श्वसन आजार (एसएआरआय) सह रूग्णालयात दाखल व्यक्ती या सर्वांचीही चाचणी आता होणार आहे.
आयसीएमआरने हॉटस्पॉट्स (जास्त प्रमाणात बाधीत व संशयित असणारा भाग)मधील लोकांना जलद प्रतिपिंड किट वापरुन चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. एरवी आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल मिळण्यास 24 तासांचा कालावधी लागतो. मात्र या जलद प्रतिपिंड किट चाचणीमध्ये अर्ध्या-पाऊण तासात निकाल समजतो. चाचण्यांची संख्या वाढवल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे
आयसीएमआरने हॉटस्पॉट्स (जास्त प्रमाणात बाधीत व संशयित असणारा भाग)मधील लोकांना जलद प्रतिपिंड किट वापरुन चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. एरवी आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल मिळण्यास 24 तासांचा कालावधी लागतो. मात्र या जलद प्रतिपिंड किट चाचणीमध्ये अर्ध्या-पाऊण तासात निकाल समजतो. चाचण्यांची संख्या वाढवल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App