पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारशी उभा दावा मांडला आहे. चीनी व्हायरसच्या संकटातही त्यांची राजकारणाची खुमखुमी कमी होत नाही, ना त्यांच्या मनातील मोदी-शहा द्वेषाला ओहोटी लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी मात्र पालकत्वाची भूमिका सोडलेली नाही.पश्चिम बंगालच्या दिशेने घोंगावत येणार्या अम्फान या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन शहा यांनी ममता बॅनर्जींना दिले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारशी उभा दावा मांडला आहे. चीनी व्हायरसच्या संकटातही त्या राजकारण सोडण्यास तयार नाहीत. परंतु, केंद्रीय गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी पालकत्वाची भूमिका सोडलेली नाही. पश्चिम बंगालच्या दिशेने घोंगावत येणार्या अम्फान या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन शहा यांनी ममता बॅनर्जींना दिले आहे.
अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना फोन करून या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण मदत करेल, असे सांगितले. राज्य आणि केंद्राच्या यंत्रणांनी तयारीचा पूर्णपणे आढावा घेतला आहे. धोकादायक जागी असणार्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आदेश कॅबीनेट सचिवांनी दिले आहेत. अन्न, पाणी आणि औषधे अशा विविध अत्यावश्यक गोष्टींची संपूर्ण तयारीही केली जात आहे.
२० मे रोजी अम्फान वादळ पश्चिम बंगाल आणि बांगला देशाच्या हटिया बेट यांच्यामधून जाणार आहे. या वेळी वादळ रौद्र रुप धारण करण्याची भीती आहे. २१ वर्षात पहिल्यांदाच येत असलेल्या या भीषण चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्राकडून पूर्ण मदतीची हमी दिली.
या वादळाचा वेग कमी होण्याचाही अंदाज आहे. कोलकाता, हावडा, पूर्व मिदनापूर, उत्तर आणि दक्षिण २४ परगना आणि हुगळी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अम्फान वादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या ३६ तुकड्या ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सैन्य, नौदल आणि नौदलाच्या जहाजांसह नौदलाचे विमाने, हवाई दल आणि तटरक्षक दलालाही सज्ज राहण्यास सांगितल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली.
Array