राज्यातील उध्दव ठाकरे सरकार निर्णयांबाबत घालत असलेल्या घोळांमुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मजुरांच्या स्थलांतराचे विदारक चित्र सरकारला अशोभनीय असून मनाला वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील उध्दव ठाकरे सरकार निर्णयांबाबत घालत असलेल्या घोळांमुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मजुरांच्या स्थलांतराचे विदारक चित्र सरकारला अशोभनीय असून मनाला वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
भुजबळ म्हणाले, स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर नेमका काय इलाज केला पाहिजे हे मलाही सुचलेलं नाही. पण हा मुद्दा मी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मी हा विषय मांडला असताना अनेकांनी मला पाठिंबा दिला. कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरु केले तर हे स्थलांतर थांबण्याची शक्यता आहे. लॉकडाउन हा एकमेव उपाय असू शकत नाही.
सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे लोकांचा गोंधळ होत असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. निर्णय घेण्याचे सगळे हक्क जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना आहेत. आम्ही सूचना देत असलो तरी निर्णय अधिकारीच घेतात.
तुम्हाला अधिकार आहेत याबाबत काही म्हणणं नाही मात्र निर्णय स्थानिक पातळीवर घेताना गोंधळ नको, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरच्या निर्णयांमध्ये मेळ नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Array