देशात चीनी व्हायरसचा संसर्ग पसरण्यासाठी एक कारण बनलेल्या दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे सिध्द झाले आहे. या मरकझमध्ये सहभागी झालेले ९ परदेशी नागरिक असलेले तबलिगी गडचिरोली जिल्ह्यात सापडले आहेत.
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : देशात चीनी व्हायरसचा संसर्ग पसरण्यासाठी एक कारण बनलेल्या दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे सिध्द झाले आहे. या मरकझमध्ये सहभागी झालेले ९ परदेशी नागरिक असलेले तबलिगी गडचिरोली जिल्ह्यात सापडले आहेत.
कझाकिस्तान व किरगिझस्तान या दोन देशातील 9 नागरिकांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.करोना विषणू संसर्ग सुरू असतांनाच निजामुद्दीन दिल्ली येथून गडचिरोलीत दाखल झालेले 9 विदेशी नागरिक हे पर्यटन व्हिसा घेवून येथे वास्तव्यास होते. या 9 जणांनी 8 मार्च रोजी दिल्ली येथे मरकज कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ते गडचिरोलीत आले होते.
त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून संस्थात्मक विलगिकरणात ठेवले होते. आज त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.विशेष म्हणजे 11 विदेशी व २ भारतीय परराज्यातील नागरिक चंद्रपूर येथील छोटी मशिदमध्ये आले होते.
चंद्रपूर येथे आल्यानंतर नमूद विदेशी नागरिकांनी जिल्ह्यातील इतर ठिकाणी प्रवास करून त्यांनी व्हिसाचे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरूध्द चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारावर शहर पोलिसांनी त्यांना अटक केली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App