कोरोना बाधीतांच्या वाढत्या संख्येने पुण्यात चिंता;-पुणे बनले कोविड-19 चा हॉटस्पॉट; दिवसभरात ८ जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२९ झाली असून गेल्या २४ तासात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी देखील आणखी २ मृत्यू पुणे शहरात झाल्याची खबर आहे. अर्थात सरकारी सूत्रांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ..दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, कोरोनाबाधित २२९ रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४४ जण आहेत. खालोखाल सांगली (२६), सांगली (६) आणि कोल्हापूर (३) असे प्रमाण आहे. सोलापुर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित आढळलेला नाही. दरम्यान, बुधवारी पुणे विभागात झालेल्या ८ मृत्यूमुळे कोरोना बाधित बळींची संख्या १६ पर्यंत पोहचली आहे. मात्र ३३ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

पुणे महानगर पालिकेने शहरात २५ फ्लू क्लिनिक सुरू केले आहे.जेणे करून लक्षणे दिसली तर तातडीने उपचार करता येईल. मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे, त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फ़त उपाययोजना करण्यात येत असून महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे २५ दवाखाने सकाळी आठपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय नागरिकांसाठी पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, कनेक्टींग संस्थेच्या सहकार्याने कोरोनाविरुद्ध वस्ती मित्र हेल्पलाईन (मुख्यत्वे वस्त्यांमधील नागरीकांसाठी) क्र. ०२०-२५५०६९२३ /२४/२५ अशी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू करण्यात आलेली आहे.

आजपर्यंत विभागामधील २१ लाख ११ हजार २४२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ८७ लाख १० हजार ७९५ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ७०६ व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे, असे डॉ. म्हेसेकर यांनी सांगितले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात