कोरोनाविरुद्धच्या दीर्घकालीन लढाईसाठी भाजप महिला मोर्च्याची घरगुती ‘मास्क मूव्हमेंट’; राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती; देशभरात तीन लाखांहून अधिक मास्कची निर्मिती

विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना व्हारयसचे संकटाला तोंड देण्यासाठी लाॅकडाऊनचा उपाय प्रभावी म्हणून सिद्ध होत आहे. मात्र, कोरोनाचा धोका पुढील काही महिनेतरी राहू शकतो, हे लक्षात घेऊन भाजपा महिला मोर्चाने घरगुती मास्क बनविण्याचे देशव्यापी अभियान (मास्क मूव्हमेंट) हाती घेतले आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक मास्क बनविले गेले असल्याची माहिती महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

“कोरोनाच्या वैश्विक संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्यास जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनावर मात करण्याच्या लढाईला बळकटी आली आहे. १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन चालू राहील. लाॅकडाऊननंतरही कोरोनाच्या संसर्गाचा धोका काही महिनेतरी राहू शकतो, हे लक्षात घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेवरून महिला मोर्च्याने घरगुती मास्क बनविण्याचे अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, केरळ, ओडिशा आदी प्रमुख राज्यांमध्ये मास्क बनविण्याचे काम चालू झाले आहे. महाराष्ट्रातही ते काम चालू होत आहे,” असे रहाटकर यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये हे काम चालू झाल्याचे त्यांनी सांगितले.

“मास्कचे दोन प्रकार आहेत. डिस्पोजेबल (सर्जिकल) आणि घरगुती बनविलेले. सर्जिकल मास्क हे प्रामुख्याने डाॅक्टर्स व रूग्णालयातील कर्मचारयांना लागतात. पण सामान्य व्यक्तींना घरगुती बनविलेले मास्कदेखील पुरेसे असतात. शंभर टक्के कापसांपासून बनविलेले, घरातील जुन्या चांगल्या कपड्यांपासून बनविलेले हे मास्क अगदी स्वस्तात बनविले जाऊ शकतात आणि स्वच्छ धुवून त्याचा फेरवापरही करता येतो. याउलट सर्जिकल मास्क महागडे असतात आणि ते एकदाच वापरता येतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जर ऐंशी टक्के जनतेने घरगुती मास्कचा प्रभावी वापर केल्यास कोरोनाचा धोका संपूर्णत टळेल. हे सगळे लक्षात घेऊन महिला मोर्च्याने हे अभियान हाती घेतले आहे. हे मास्क स्वत:च्या कुटुंबासाठी बनविले जाऊ शकतात. उरलेले मास्क अत्यंत स्वस्त किंमतीत उपलब्ध होऊ शकतात,” असे रहाटकर म्हणाल्या.

प्रौढांसाठी ९ इंच बाय ७ इंच आणि मुलांसाठी सात इंच बाय पाच इंच या आकाराचे हे मास्क असतील. मास्क बनविण्यात येणारे साहित्य मात्र उकळत्या पाण्यामध्ये गरम करणे गरजेचे आहे आणि त्याची नियमित निगा राखणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात