कोरोनाचा कोपात चिनी बॅंकेची बड्या भारतीय बॅंकेत शेअर्स खरेदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चिनी विषाणूच्या कोपामुळे सगळे जग चिंतेत असतानाच पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) ने मार्चच्या तिमाहीत एचडीएफसी लिमिटेड या भारतातल्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त संस्थेचे तब्बल पावणेदोन कोटी शेअर्स विकत घेतले आहेत.

एक्सचेंज आकडेवारीनुसार, चिनी सेंट्रल बँकेने एकूण 1 कोटी 74 लाख 92 हजार 909 शेअर्स विकत घेतले आहेत. चीनमधल्या वुहान प्रांतात कोविड-19 धुमाकूळ घालत असतानाच्या काळात म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यान ही शेअर खरेदी झाली असण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये एचडीएफसीचे शेअर्सच्या किमतींवर परिणाम झाला होता. नेमक्या याच वेळेत चिनी बॅंकेने शेअर खरेदी करण्याची वेळ महत्त्वपूर्ण आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून एचडीएफसीच्या शेअर्समध्ये 41 टक्क्यांनी घट झाली आहे, हे विशेष.

सूत्रांनी सांगितले की, 14 जानेवारी 2020 रोजी एचडीएफसीच्या शेअर्सच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या तुलनेत 32 टक्क्यांनी घसरण झाली. याच काळात भारताचा बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स 25 टक्क्यांनी घसरला तर 50 समभागांचा निफ्टी 26 टक्के खाली बंद झाला. तर 10 एप्रिलला एचडीएफसीचे शेअर्स 1,701.95 रुपयांवर बंद झाले. एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी सांगितले की, चिनी बॅंक विद्यमान भागधारक आहे आणि मार्च 2019 पर्यंत कंपनीत त्यांची 0.8 टक्के मालकी होती. एका वर्षामध्ये त्यांनी शेअर खरेदी वाढवत नेली असून आता त्यांची मालकी 1.01 टक्के आहे. दरम्यान, भागभांडवलाच्या 1 टक्के हा उंबरठा चिनी बॅंकेने ओलांडला असल्याने नियमानुसार या संबंधीची माहिती बॅंकेने दिली आहे. एचडीएफसी सारख्या आजपर्यंत यशस्वी असणाऱ्या व्यावसायिक भारतीय बॅंकेत चिनी बॅंकेने दाखवलेला रस आर्थिक क्षेत्रात कुतूहलाचा विषय बनला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात