कोरोनाचा कहर असतानाही इम्रान खान यांची भारताविरुध्द गरळ

पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचा कहर असताना पंतप्रधान इम्रान खान उपाययोजना करण्यापेक्षा भारताविरुध्द गरळ ओकण्यातच समाधान मानत आहे. पाकिस्तानी जनतेशी मंगळवारी संवाद साधताना इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मात्र, पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खान यांना धारेवर धरून घरचा आहेर दिला.


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचा कहर असताना पंतप्रधान इम्रान खान उपाययोजना करण्यापेक्षा भारताविरुध्द गरळ ओकण्यातच समाधान मानत आहे. पाकिस्तानी जनतेशी मंगळवारी संवाद साधताना इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनसाठी देशवासियांची माफी मागितल्याचे सांगत टीका केली. यावरून पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी इम्रान खान यांना धारेवर धरून घरचा आहेर दिला.

जनतेला संबोधित करताना इम्रान खान यांनी दावा केला आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लोकांना अडचण आल्याने त्यांनी देशवासियांची माफी मागितली. इम्रान खान यांच्या या दाव्यावर पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खान यांना लक्ष्य केले. ते सोमवारी पाकिस्तानी जनतेला संबोधित करत होते.

एका बाजुला पाकिस्तानात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. आत्तापर्यंत २००७ रुग्ण नव्याने समोर आले आहेत. २८ जणांचा बळी गेला आहे. तरीही आर्थिक संकटात सापडलेला देश लॉकडाऊनमुळे अगदीच रसातळाला जाईल या भीतीने इम्रान खान यांनी संपूर्ण लॉकडाऊन केले नाही. पाकिस्तानातील मशीदींमध्ये नमाजासाठी गर्दी होत आहे. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

पाकिस्तानातील सर्व प्रांतात कोरोनाचे रुगण सापडत आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यात आर्थिक मदत सरकारकडून केली जात नसल्याचे येथील माध्यमांमधून सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्याच्या इम्रान खान यांच्या दाव्याला चुकीचे म्हटले आहे. मोदी यांनी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर लोकांना जे संकट झेलावे लागले किंवा ज्या असुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांनी देशवासियांची माफी मागितली. लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने मोदींनी माफी मागितली नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोनाच्या उपाययोजना गांभिर्याने करताना दिसत नसल्याचे येथील माध्यमांचे निरिक्षण आहे. खान यांनी गेल्या आठवड्यत १०० टक्के लॉकडाऊन करण्यास विरोध केला होता. यामुळे गरीब आणि कमजोर संकटात सापडतील असे त्यांनी म्हटले होते. दुसर्या बाजुला शुक्रवारी त्यांनी सामूहिक नमाज पढण्यासाठी परवानगी दिली. काही तास अगोदर त्यावर बंदी आणली. परंतु, लोकांनी ऐकले नाही. मोठ्या संख्येने लोक बाहेर पडले. आमच्या सरकारकडून काही उपाययोजना होतील याबाबत बिलकुल खात्री नाही. त्यामुळे अल्लाहची प्रार्थना करत मरणेच योग्य ठरेल असे येथील नागरिक म्हणत आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात