केंद्राने केला महाराष्ट्रातील सगळा कापूस खरेदी; शेतकर्‍यांना मिळाले ४९८७ कोटी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना दिलासा दिला असल्याची बातमी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व कापसाची खरेदी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) केली असून त्यापोटी कापूस उत्पादक शेतकरयांना ४ हजार ९८७ कोटी रूपये दिले आहेत. देशभरातील कापूस उत्पादकांनाही २३५१४ कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक खरेदी आहे.

नवी मुंबईत मुख्यालय असलेले कापूस महामंडळ हे वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येते. स्मृती इराणी यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली. त्या म्हणाल्या, मार्चमध्येच महाराष्ट्रातील ७७.४० टक्के कापूस खरेदी केला होता. त्यानंतर लाॅक़डाऊन असतानाही एप्रिल महिन्यांत ३४ खरेदी केंद्रावरून उर्वरित २२.६० टक्के (सुमारे ६९०० गाठी) कापूस खरेदी करण्यात आला. त्याची रक्कम ४९८७ कोटी रूपये (४९९५ कोटींपैकी) शेतकरयांना देण्यात आली आहे. कापूस उत्पादकांची योग्य ती काळजी घेण्यात येत असून रेड झोनमधील कापूस उत्पादकांना खरेदी केंद्रापर्यंत पोहोचता यावेत, म्हणून विशेष पासेस दिले गेले.

देशभरामधूनही २३५२५ कोटी रूपयांची कापूस खरेदी केली गेली. त्यापैकी २३५१४ कोटी रूपयांची रक्कम अदाही करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात