एक कोटीच्या मदतीबरोबरच इम्रान खान यांना मिळाली चीनी व्हायरसची धास्ती

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचीही आता चीनी व्हायरसची चाचणी होणार आहे. कदाचित त्यांना ‘आयसोलेशन’मध्येही जावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे एका सामाजिक कार्यकर्त्यांने खान यांची एक कोटी रुपयांची मदत देण्यासाठी भेट घेतली. आता हे सामाजिक कार्यकर्तेच चीनी व्हायरसने बाधित झाले आहेत.


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचीही आता चीनी व्हायरसची चाचणी होणार आहे. कदाचित त्यांना आयसोलेशनमध्येही जावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे एका सामाजिक कार्यकर्त्यांने खान यांची एक कोटी रुपयांची मदत देण्यासाठी भेट घेतली. आता हे सामाजिक कार्यकर्तेच चीनी व्हायरसने बाधित झाले आहेत.

इदी फाऊंडेशनचे अध्यक्ष फैझल इदी यांनी मागच्या आठवडयात इम्रान खान यांची भेट घेतली होती. त्यानंतर फैैझल यांना चीनी व्हायरसची बाधा झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

इम्रान खान यांचे डॉक्टर आणि शौकत खानम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे सीईओ फैझल सुल्तान लवकरच इम्रान खान यांची भेट घेणार आहेत.  इम्रान खान यांनी भेटून करोना चाचणी करण्यास सांगणार आहे. प्रोटोकॉलनुसार मी त्यांना सल्ला देईन, असे फैझल सुल्तान यांनी सांगितले. सध्या इम्रान खान यांचे नेहमीसारखे काम सुरु आहे. मंत्रिमंडळाच्या बैठका ते घेत आहेत.

फैझल इदी यांनी १५ एप्रिलला इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चीनी व्हायरसची लक्षणे दिसून आली असे त्यांचा मुलगा साद याने सांगितले आहे.  माझे वडिल इस्लामाबादमध्ये असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्यांना कुठल्याही रुग्णालयात ठेवण्यात आलेले नसून, ते सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत अशी माहिती साद यांनी दिली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात