विशेष प्रतिनिधी
अंबरनाथ : अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडरमॅनचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव असं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा हा सागर आता रातोरात स्टार झाला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये सागरचं मोठं कौतुक होत आहे.
मूळचा नाशिकचा असलेला आणि आधी अतिशय सडपातळ असलेल्या सागरला ३० किलोचा सिलेंडर उचलायचा, तर आपण ४५ किलोचं असून कसं चालेल? असा प्रश्न पडला आणि त्याने मागच्या ३ वर्षांपासूनच जिममध्ये जाऊन शरीरयष्टी कमवायला सुरुवात केली. यानंतर आता त्याला पाहिलं, की जुना सागर नक्की हाच होता का?, असा प्रश्न पडतो.
सागर हा आता सोशल मीडियावरचा सेलेब्रेटी बनलाय. पण, तरीही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. एखाद्या वेब सीरीजची किंवा जाहिरातीची ऑफर आलीच, तर ती करायला नक्कीच आवडेल, असं तो सांगतो. पण, त्याचवेळी ‘सिलेंडर मॅन’ हीच आपली खरी ओळख असल्याचंही तो नमूद करतो. त्यामुळे अंबरनाथचा हा सिलेंडर मॅन लवकरच एखाद्या जाहिरातीत किंवा मालिका, वेब सीरीज यात दिसला, तर नवल वाटायला नको. अंबरनाथकरांनाही त्याच्या या व्हायरल ‘सिलेंडर मॅन’ सध्या प्रचंड कौतुक वाटतंय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App