विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कंपनीत काम सुरू केले आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त झालेला आढळला तर कंपनीच्या मालक, भागीदार, व्यवस्थापनावर एफआयआर दाखल करण्याचे कलम केंद्र सरकारने काढून टाकले आहे.
कंपन्या निर्विघ्नपणे सुरू करता याव्यात यासाठी संबंधितांना त्रासदायक वाटणारे कलम काढून टाकण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
कंपन्या सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणारे पत्र केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिले होते. काही राज्यांनी या पत्रातील काही आशयाचा वेगळा अर्थ लावला आणि गैरसमज पसरला. संबंधित कलम काढून टाकल्याने गैरसमज दूर होऊन कंपन्या निर्वेधपणे आणि नियम पाळून सुरू करता येतील, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
कंपनी मालकांना अडचणीत आणण्यासाठी एफआयआर दाखल करण्याचा कलमाचा गैरवापर झाला असता, हे केंद्र सरकारच्या वेळीच लक्षात आले. त्यातून ताबडतोब सुधारणा करण्यात आली आहे.
या संदर्भात अजय भल्ला आणि मुख्य आर्थिक सल्लागार संजीव संन्याल यांनी उद्योग क्षेत्राशी संबंधित झालेल्या विडिओ कॉन्फरन्समध्ये खुलासाही केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App