विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसविरुध्द देशातील जनतेला लढण्यासाठी आरोग्य सेतूच्या अॅपचे शस्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मात्र, या अॅपच्या माध्यमातून नागरिकांवर हेरगिरी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर आता केंद्र सरकारने या अॅपचा सोर्स कोड सर्वांसाठी खुला केला असून हेरगिरीचा बग शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोग्य सेतू अॅप अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेले हेरगिरी अॅप असल्याचा आरोप केला होता. यामुळे गोपनीयता व डाटाची सुरक्षितता यावर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. फ्रान्सचा हॅकर इलियट अॅल्डरसन (टोपण नाव) यानेही या अॅपच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हे अॅप डाऊनलोड करणाऱ्या ९ कोटी भारतीय जनतेचे खासगी माहिती भंग होण्याचा धोका आहे, असेही त्याने म्हटले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार कोट्यवधी लोक या अॅपचा वापर करत आहेत, हेच याच्या सुरक्षिततेचे द्योतक आहे.
देशातील १३० कोटी जनतेपैकी १२१ कोटी लोक मोबाईल वापरतात. त्यातील ६० कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे आरोग्य सेतू अॅपद्वारे जवळच्या परिसरता चीनी व्हायरसचा रुग्ण आहे का याबाबत इशारा मिळणे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या माध्यमातून तीन हजार चीनी व्हायरसचे हॉटस्पॉट शोधणे शक्य झाले आहे.
मात्र, आता केंद्र सरकारने या सर्व आरोपांना उत्तर देण्याचे ठरविले आहे. या अॅपचे ९० टक्के वापरकर्ते हे अॅंड्रॉईडवर आहेत. त्यामुळे आता सरकारने अॅंड्रॉईड अॅपचे व्हर्जन ओपन सोर्स केले आहे. २६ मेच्या रात्रीपासून त्याला सुरूवात झाली आहे. आता कोणीही डेव्हलपर अॅपमध्ये कोणकोणती माहिती साठविली जात आहे, हे पाहू शकणार आहे.
सरकारने सर्व डेव्हलपर्सला आवाहन केले आहे की त्यांच्या मनात कोणताही प्रश्न असला तरी त्याचे स्वागत आहे. त्याचबरोबर सूचनांचाही स्वीकार केला जाईल. आरोग्य सेतू अॅप हे जगातील पहिले सरकारी सॉफ्टवेअर आहे, जे ओपन सोर्स केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App