आफ्रिदी, इम्रान खान यांना जास्तीत, जास्त बूट चाटायची सवयच, मानवाधिकार कार्यकर्त्याची टीका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान असोत की माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांना जास्तीत जास्त लोकांचे बूट चाटायची सवयच आहे. त्यामुळे केवळ प्रसिध्दीसाठी त्यांनी भारताविरुध्द गरळ ओकू नये, असा सल्ला पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी महापौर अजाकिया यांनी दिला आहे.


वृत्तसंस्था

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान असोत की माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांना जास्तीत जास्त लोकांचे बूट चाटायची सवयच आहे. त्यामुळे केवळ प्रसिध्द होण्यासाठी त्यांनी भारताविरुध्द गरळ ओकू नये, असा सल्ला पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी महापौर अजाकिया यांनी दिला आहे.

अजाकिया आफ्रिदीला सुनावताना म्हणाले, तू ज्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेस ती जमीन भारताची आहे, हे विसरू नकोस. मदत चार-पाच जणांना केलीस पण २५ जणांना संरक्षणासाठी घेऊन गेलास.

जो आफ्रिदी स्वत:च्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल काही बोलत नाही, त्याला आता काश्मीरी जनतेची काळजी लागली आहे. पण हाच आफ्रिदी काही वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये पैशांसाठी खेळायला जात होता. आफ्रिदी असो की इम्रान या लोकांची सवयच आहे की जास्तीत जास्त बूट चाटायचे. पाकिस्तान लष्कराने दिलेली भाषण वाचून दाखवले आणि घरात बेडरूममध्ये जाऊन बसल्याचे अजाकिया म्हणाले.

गेल्या २० वषार्पासून पाकिस्तान लष्कर आफ्रिदीच्या जमातीमधील लोकांवर अन्याय करत आहे त्यावर तो काही बोलत नाही आणि आता त्याला काश्मीरी लोकांची काळजी लागली आहे. इंग्रज जेव्हा सोडून गेले तेव्हा काश्मीरच्या राजाने भारतात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तान लष्कराने काश्मीवर हल्ला केल्याचा इतिहास अजाकिया यांनी वाचून दाखवला.

सध्याच्या घडीला जगभरात चीनी व्हायरस पसरलेला आहे. पण या   व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धमार्चा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे, अशी गरळ आफ्रिदीने ओकली होती

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात