चीनी विषाणूला नामोहरम लस अद्याप संशोधकांना शोधून काढता आलेली नाही. त्यामुळं चीनी विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी व्यक्तिगत स्वच्छता राखणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हेच सर्वात प्रभावी उपाय आहेत. मात्र वारंवार विनंती केल्यानंतरही देशातले हजारो नागरिक याचं सरासर उल्लंघन करत आहेत. यातून त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होत आहे. काही नागरिकांचा हाच बेजबाबदारपणा उघडा पाडण्यासाठी रिजिजू यांनी उपहासात्मक ट्विट केलं आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असल्याचं सांगत आहेत. त्यांच्या या आवाहनाला अनेक ठिकाणी हरताळ फासला जात आहे. मात्र, माकडंसुद्धा फिजिकल डिस्टन्सिंग पाळत असल्याचा एक फोटो केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या ट्वीटरव हॅंडलवर पोस्ट केला आहे.
मुकीबिचारी माकडंसुद्धा बसताना विशिष्ट अंतर ठेऊन बसतात, मग मुठभर बेजबाबदार माणसांनी हे भान पाळायला काय हरकत आहे, असा प्रश्न यातून उपस्थित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय.
माणसांनी अगदी आदर्श घ्यावा असा हा फोटो आहे. यामध्ये कलिंगड मिळाले असूनही माकडांंनी त्यावर तुटून पडून गर्दी केली नाही. अगदी ठराविक अंतर ठेऊन बसली आहेत आणि कलिंगड खात आहेत. हा फोटो अरुणचाल प्रदेशातील असल्याचे त्यांंनी म्हटले आहे.
हा फोटो ट्विट करत किरण रिजिजू यांनी म्हटले आहे की, सोशल डिस्टन्सिंग कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेजवळ असलेल्या भालुपोंगजवळचा हा फोटो आहे. आपण नीट पाहिलं तर ही माकडे आपण कसं वागलं पाहिजे याचा धडाच आपल्याला शिकवत आहेत.
माकडांनी केळी आणि कलिंगडाच्या फोडी याचा मनमुराद आस्वाद घेतला. जेव्हा या माकडांमधली काही माकडं फळं खात होती तेव्हा इतर माकडं आपली वेळ येईल म्हणून वाट बघत होती. किरण रिजिजू यांनी ट्विट केलेला हा फोटो हजारो नागरिकांनी रिट्विट केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App