अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांचे मदतीसाठी मोदींकडे साकडे

चीनी व्हायरसचा सर्वाधिक उद्रेक अमेरिकेत झाला आहे. गेल्या चोवीस तासांत दीड हजारांवर लोकांचा मृत्यू झाला.  मृतांचा एकूण आकडा इटलीपेक्षाही पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे साकडे घाले आहे. पंतप्रधान मोदींकडे  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती ट्रंप यांनी केलीआहे.


वृत्तसंस्था 
वॉशिंग्टन : चिनी व्हायरसचा सर्वाधिक उद्रेक अमेरिकेत झाला आहे. गेल्या चोवीस तासांत दीड हजारांवर लोकांचा मृत्यू झाला.  मृतांचा एकूण आकडा इटलीपेक्षाही पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे साकडे घाले आहे. पंतप्रधान मोदींकडे  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती ट्रंप यांनी केलीआहे.
डोनाल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी  यांच्यात व्हिडीओ  कॉन्फरन्सिंग द्वारे  चर्चा झाली. या वेळी दोन्ही देशांनी चीनी व्हायरसचा एकत्रितपणे मुकाबला करण्याचा निर्धार केला, अशी माहिती पंतप्रधांनी ट्विटरद्वारे दिली आहे.  पंतप्रधान  म्हणाले, ‘अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली. आमची चर्चा खूप चांगली होती आणि कोविड -19 च्या व्यवहारात भारत-अमेरिकेच्या भागीदारीची पूर्ण शक्ती वापरण्यास आम्ही सहमती दर्शविली.
जगात चीनी व्हायरसमुळे आतापर्यंत 63 हजारांहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत.  अमेरिकेत कोरोना विषाणूमुळं 24 तासांत 1480 लोकांचे प्राण गमावले आहेत. अमेरिकेत तर हाहा:कार माजला आहे. सर्व रुग्णालये भरली आहेत. लोकांना औषध मिळणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील डॉक्टर वापरत असलेल्या  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्याच अमेरिकेसाठी आधार आहे. मात्र भारताने मलेरियावर वापरल्या जाणार्या या गोळ्यांची निर्यात बंद केली आहे. आताच्या कठीण परिस्थितीत अमेरिकेला या गोळ्या पाठवाव्यात अशी विनंती ट्रप यांंनी केली. मीसुध्दा हे औषध घेऊ शकतो. त्यासाठी डॉक्टराशी बोलणे आवश्यक असल्याचे ट्रम्प म्हणाले.
हायड्रोक्सी क्लोरोक्विन हे औषध अँटी-मलेरिया औषध क्लोरोक्विनपेक्षा भिन्न आहे. ही एक टॅबलेट आहे जो आटोम्यूनसारख्या रोगांच्या उपचारांमध्ये वापरला जातो, परंतु कोरोना रोखण्यासाठीही याचा उपयोग केला गेला आहे. सार्स-कोव्ह -2 वर या औषधाचा विशेष प्रभाव आहे. 19 मार्च रोजी लॅन्सेट ग्लोबल हेल्थमध्ये लिहिलेल्या एका लेखात या औषधाचे फायदे आणि रोगांविरूद्ध लढा देण्याच्या क्षमतेचे वर्णन केले आहे. या लेखात यावर जोर देण्यात आला की हे औषध कोरोनोव्हायरसविरूद्ध एंटी-व्हायरल पद्धतीने कार्य करते.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात