अफगणिस्थानच्या माजी गुप्तहेरप्रमुखाने एक सनसनाटी माहिती दिली आहे. पाकिस्तान आपल्या बगलबच्चा असलेल्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून दहशतवादी हल्याची तयारी करत आहे. पश्चिमी देशांमध्ये ९/११ सारखा हल्ला करण्याची योजना आखली जात आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगणिस्थानच्या माजी गुप्तहेरप्रमुखाने एक सनसनाटी माहिती दिली आहे. पाकिस्तान आपल्या बगलबच्चा असलेल्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून दहशतवादी हल्याची तयारी करत आहे. पश्चिमी देशांमध्ये ९/११ सारखा हल्ला करण्याची योजना आखली जात आहे.
अफगणिस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षा आयुक्तालयाचे माजी संचालक रहमतुल्ला नबील यांनी रविवारी एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. पाकिस्तानातील हक्कानी दहशतवाद्यांचे जाळे सातत्याने अल कायदाला पाठिंबा देत आहे.
या भागातील शासनप्रायोजित दहशतवाद कमी झाला नाही तर पुन्हा एकदा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो. अल कायदाचे अल जवाहिरी, अबु मुहम्मद अल मसरी आणि सैफ उल अदेल यांना पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्ककडून मदत मिळत आहे. यातून मोठ्या हल्याची योजना बनविली जात आहे.
१९८० च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियनच्या फौजांशी लढण्यासाठी अमेरिकेनेच जलालुद्दीन हक्कानी याच्या नेतृत्वाखाली हक्कानी नेटवर्क तयार केले होते. त्यांनंतर जलालुद्दीन हक्कानी याने आपल्या दहशतवादी संघटनेत ओसामा बिन लादेन याला सहभागी करू घेतले.
संपूर्ण जगासवर इस्लामी राज्य आणण्यासाठी अल कायदाने कट्टर दहशतवाद्यांचे जाळे तयार केले. ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बिल्डींगसह अनेक ठिकाणी विमानांनी हल्ला करण्यात आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App