पालघरमधील मॉब लिचींगप्रकरणी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठविले होते. पालघरमधील ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध केला असून त्यासाठी आॅनलाईन मोहीम राबविण्यात येत आहे.
विशेष प्रतिनिधी
पालघर : पालघरमधील मॉब लिचींगप्रकरणी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठविले होते. पालघरमधील ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध केला असून त्यासाठी आॅनलाईन मोहीम राबविण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधूंसह तिघांची चोर असल्याच्या संशयातून जमावाने निर्घृण हत्या केली होती. पोलीसांच्या समोर झालेल्या या घृणास्पद प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर देशमुख यांनी गौरव सिंह यांच्यावर कारवाई केली होती.
मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. सुजित सिंह आणि करण चौधरी यांनी ही ऑनलाइन याचिका सुरु केला आहे. याचिकेतून त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांकडे गौरव सिंह यांनी पुन्हा नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर ३५० जणाहून अधिक जणांच्या सह्या आहेत. याचिकेला ३५० हून अधिक जणांनी समर्थन दिलं आहे.
सिंह यांनी जिल्ह्यातील वाळू माफियसारख्या बेकायदा गोष्टी, गुटखा, दारु माफिया यांना हद्दपार करण्या मदत केल्याचं सांगितलं आहे. सोबतच पोलिसांची एक चांगली प्रतिमा समाजात उभी केली होती, ज्यामुळे लोकांना पोलिसांची भीती वाटत नव्हती असंही याचिकेतून सांगितलं आहे.
आम्ही जिल्ह्यातील अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या. यानंतर त्यांनी त्यावर तात्काळ कारवाई करत येथील लोकांचं मन जिंकलं होतं, असं आसिफ धनानी यांनी सांगितलं आहे. आसिफ यांनीही याचिकेला पाठिंबा दिला आहे. पोलीस अधिक्षक आमच्यासाठी एक महत्त्वाची व्यक्ती असून त्यांना पुन्हा आणलं पाहिजे आणि दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु दिला पाहिजे, अशी मागणी डॉ. हितेश चौरी यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App