अजित डोवालांनी काढली महंमद सादची हेकडी; निजामुद्दीन ऑपरेशन यशस्वी

विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना महंमद साद याची हेकडी काढून त्याला सरळ करण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट होत आहे. निजामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातच्या मरकजमधील गंभीर परिस्थितीची माहिती १८ मार्चलाच गृहमंत्री अमित शहा यांच्या लक्षात आणून देण्यात आली होती. पोलिसांनी मरकज परिसर खाली करण्याचे प्रयत्न करून पाहिले परंतू, महंमद सादने त्यांना अजिबात दाद दिली नाही. त्याने अडेलतट्टू धोरण कायम ठेवले होते. शेवटी अमित शहा यांनी अजित डोवाल यांना अँक्शन मोडमध्ये आणले.

त्यांनी २८, २९ मार्चच्या मध्यरात्री मरकजमध्ये जाऊन महंमद सादची भेट घेतली. त्याची “समजूत” काढली आणि मरकज खाली करण्याच्या प्रक्रियेला वेग आणला. महंमद सादची गुर्मी आधी एवढी वाढली होती की त्याने मरकजमधील लोकांची कोविड १९ ची चाचणी करण्यासही नकार दिला होता. मरकजमधून बाहेरच्या राज्यात गेलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर मरकजमधील लोकांची चाचणी करावी, यासाठी पोलिसांनी दबाव वाढवला होता. पण महंमद साद मानायला तयार नव्हता. मरकजमध्ये २१६ परदेशी नागरिक होते. यात इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेशाचे नागरिक होते. त्यांनी टूरिस्ट व्हिसावर भारतात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे मिशनरी व्हिसा नाही. तरीही हे लोक व मरकजमधील अन्य परदेशी लोक भारतभर फिरत होते. जानेवारीपासून मार्चपर्यंत सुमारे २००० परदेशी नागरिक मरकजमध्ये राहून देशभर फिरत होते. त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू झाले आहे. 

लॉकडाऊनच्या काळातही मरकजमधील कार्यक्रम बिनदिक्कतपणे सुरू होते. अजित डोवाल अँक्टीव मोडमध्ये आल्यावर मरकजमधील १५०० लोक काल दोन तासांमध्ये बाहेर काढण्यात आले. मरकरजमधील महंमद साद ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी अजित डोवाल यांनी देशातील प्रमुख मुस्लीम धर्मगुरूंशी “आपल्या पद्धतीने” संपर्क साधला होता. त्यामुळे मरकजवरील कारवाईनंतर त्या समूदायातून फारशी प्रतिकूल प्रतिक्रिया आली नाही. मौलाना महंमद साद कुटुंबीयांसह फरार झाला. फक्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तबलिगी जमातच्या समर्थनासाठी पुढे आली. पण बहुतेक उलेमा, मौलानांनी तबलिगी जमातवर टीकाच केली. हा डोवाल इफेक्ट असल्याचे मानले जात आहे. डोवाल यांनी हस्तक्षेप केल्यानंतर तबलिगी जमातने १६७ लोकांच्या चाचणीला आणि त्यांना क्वारंटाइन करायला मान्यता दिली.

  • मौलाना महंमद साद फरार. सादच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांनी ८ तुकड्या तयार केल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठविण्यात येत आहे. दोन तुकड्या उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आल्या आहेत.
  • मौलाना महंमद साद १८ मार्चपासून सतत लॉकडाऊनची खिल्ली उडवणारी भाषणे करीत होता. ती भाषणे यू ट्यूब वर उपलब्ध आहेत. त्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
  • दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमातून २१ जण नाशिकमध्ये आल्याची माहिती. त्यांनी १८ मार्चच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. साताऱ्यातील पाच जणांचीही ओळख पटवून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात