दारूची दुकाने उघडली जाऊ शकतात, तर मंदिरेही उघडावीत; मंदिर विश्‍वस्तांची मागणी


विशेष प्रतिनिधी

पुणे : आज समाजाला मद्याची नाही, तर श्रद्धेच्या आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली सर्व दारूंची दुकाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून उघडली जाऊ शकत असतील, तर त्याच प्रकारे सर्व नियम पाळून हिंदूंची सर्व मंदिरेही तात्काळ खुली केली जावीत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील समस्त मंदिरांच्या विश्‍वस्तांनी केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे म्हणून ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला राज्यातील 225 मंदिर विश्‍वस्त, मंदिर पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी वरील मागणीचा ठराव करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तो पाठवण्यात आल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दळणवळण बंदीमध्ये दारूची दुकाने उघडण्यापेक्षा लोकांच्या श्रद्धा जपण्यासाठी चर्चेस उघडणे अत्यंत आवश्यक असल्याचे विधान नुकतेच केले आहे. तसेच त्यांनी प्रशासनाला तसे निर्देशही दिले. संकटकाळामध्ये ‘श्रद्धा’ हीच समाजाचा आधार असते, असा दाखला यावेळी बैठकीत देण्यात आला.

भारताची राज्यघटना ‘सेक्युलर’ असूनही शासन केवळ हिंदु मंदिरांचे व्यवस्थापन कसे काय पाहू शकते ?’, केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे सरकार मशिदी, चर्च आदींचे सरकारीकरण करण्यापासून का कचरते ? सरकारीकरण केलेल्या मंदिरांची स्थिती अत्यंत भयावह आहे. अनेक मंदिरांत सरकारी समित्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे; मंदिरांच्या परंपरा, धार्मिक कृती, पुजारी आणि अन्य प्राचीन व्यवस्था आदींमध्ये मनमानी पद्धतीने सरकारी हस्तक्षेप चालू आहे.

मंदिरांवरील अशा सर्व आघातांविरोधात ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशना’त ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियान’ देशभरात आरंभले होते. या अभियानाच्या अंतर्गतच मंदिर विश्‍वस्तांचे हे ‘ऑनलाईन’ चर्चासत्र पार पडले.

या वेळी ‘मोठ्या मंदिरांनी परिसरातील लहान मंदिरांना साहाय्य करण्यासाठी दत्तक घ्यावे’, ‘मंदिरांमध्ये भाविकांना धर्मशिक्षण मिळावे यांसाठी व्यवस्था करावी’, ‘मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करण्यात यावे’, असेही ठराव मंदिर विश्‍वस्तांनी एकमुखाने संमत करण्यात आले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात