सीमेवर मार खाणाऱ्या पाकड्यांकडून भारत आणि मोदींविरोधात आता ‘सायबर वॉर’


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सीमेवरच्या युद्धात सातत्याने मार खात आलेल्या पाकिस्तानने भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी नव्या रणनितीची अवलंब चालू केला आहे. सोशल मीडियातील संदेशातून भारत आणि मोदींची बदनामी करण्याचे पाकिस्तानी यंत्रणेचे प्रयत्न भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उघड केले आहेत.

भारत विरोधी भावना भडकावण्यासाठी, भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. आखाती देशांमध्ये, पाकिस्तानमध्ये एवढेच नव्हे तर भारतातही भारताविरोधी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाद्वारे सुरु आहे. इस्लामसंबंधीची माहिती यासाठी वापरली जात आहे, असे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे चिनी विषाणूच्या संकटकाळात पाकिस्तानला भारत मदत करत असतानाही हा विषारी प्रचार चालू आहे.

नॉर्थ ब्लॉकने केलेल्या तपासणीत पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये असलेल्या ट्रोल हँडलची लांबलचक यादी उघड झाली आहे. हे ट्रोलर सोशल मीडियावर सातत्याने भारतविरोधी गरळ ओकत राहतात. अर्थात हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी असतानाही सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर अशा घटना उघड झाल्या होत्या. जम्मू-काश्मिरसंदर्भातला कायदा भारतीय संसदेने केला तेव्हा भारताची बदनामी करण्याचे खास प्रयत्न झाले.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीनगरमध्ये पहिला हल्ला होण्यापूर्वीच पाकिस्तानकडून वित्तपुरवठा करण्यात आलेल्या नवीन दहशतवादी संघटनांनी सोशल मीडियावर तारे तोडण्यास सुरुवात केली याचे पुरावे मिळाले. काश्मिरात तेव्हा इंटरनेट बंदी होती. अशा प्रकरणात आखाती देशांतील नामांकित व्यक्तींचा बनावट प्रचारासाठी पद्धतशीर उपयोग केला जातो. त्यासाठी अजेंडा तयार केला जातो. या प्रयत्नात पाकिस्तान आयएसआयच्या सहभागाचे स्पष्ट संकेत असल्याचे एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

मंगळवारी पाकिस्तानमधील घटकांनी चालवलेले हॅशटॅग “शेम ऑन मोदी” होते. त्या आधी एक दिवस, हॅशटॅग “केऑस इन इंडिया” असा होता. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधणारी मोहीम पद्धतशीरपणे राबवली जात आहे. एकीकडे पाकिस्तानात चिनी विषाणूने कहर माजवला असताना मोदींच्या नेतृत्वाखालील भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर भारताची बदनामी करण्यासाठी भारतातील मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचे, त्यांना छळले जात असल्याचे बनावट व्हिडीओ सोशल मीडियात प्रसारीत केले जात आहेत. यासाठी शिस्तबद्ध इंजिनिअरींगचा वापर होत आहे. यासाठी ग्रीगेटर्स, फीडर, स्प्रेडर्स आणि प्रभावकारांचा उपयोग होतो आहे. फीडर एकत्रीकरांकडून व्हिडिओ संकलित केले जातात. हे लोक वर्गीकृत केलेले ट्विटर हँडल हाताळतात, व्हिडिओ किंवा छायाचित्रांसाठी योग्य मेसेज तयार करतात आणि नंतर ते प्रसारकांना पाठवून देतात. यातल्या बहुतेक फीडरचे ट्विटर हँडल नुकतेच जानेवारी ते एप्रिल दरम्यान तयार करण्यात आले आहे. भारत आणि मोदींना लक्ष्य करण्याची स्पष्ट योजना आणि संघटित प्रयत्न त्यामागे आहेत.

प्रसारक म्हणून वर्गीकृत केलेली अनेक हँडल पाकिस्तानातही आहेत. उदाहरणार्थ एका स्त्रीने (हा एक पुरुषही असू शकतो) मंगळवारी ट्विटरवर आपल्या दिवसाची सुरूवात करताना प्रख्यात कवी इकबाल यांची आठवण म्हणून एक पोस्ट केली. मग, तिने तिचे भारताच्या बदनामीचे खरे काम चालू केले. एका दिवसात दोनशेपेक्षा जास्त ट्वीट आणि रीट्वीट पोस्ट केले होते; समान हॅशटॅगसह दर तीन मिनिटांत सरासरी एक या प्रमाणे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, आखाती देशातील विविध देशांमध्ये बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्येही अपप्रचार करणारे अनेक पाकिस्तानी आहेत. मात्र हे सर्व जुने आणि खोट्या ओळखीसह चालवले जाणारे हॅंडल आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती