शेजारील राष्ट्रांना मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन


चीनी व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे व मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. या दोन्ही राष्ट्रांना मदतीचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे व मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. या दोन्ही राष्ट्रांना मदतीचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधान याविषयी माहिती देताना म्हणाले,गोताबाया व जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली त्या-त्या देशांनी चीनी व्हायरसचा निकराने प्रतिकार केला आहे व आपापल्या देशांतील स्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

समुद्रमार्गे जोडल्या गेलेल्या या शेजारी देशांत उद्भवणाऱ्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत निश्चितच मदत करेल. श्रीलंका, मॉरिशस व आपली संस्कृती एकसारखीच आहे,त्यामुळे त्यांच्यात व आपल्यात सुरुवातीपासून चांगले संबंध आहेत. या कठीण काळात या दोन्ही देशांच्या आपण पाठिशी उभे आहोत.

चीनी व्हायरस पश्चात काळात श्रीलंकेत भारताच्या मदतीने आणखी विकास प्रकल्प हाती घेण्यात येतील असे राजपक्षे व जगन्नाथ यांनी मान्य केल्याची माहितीही मोदी यांनी दिली

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात