विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोरोनाच्या प्रादूर्भावातील रेड झोनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल मॉडेल फॉलो करण्याची सूचना सर्व राज्यांना केली आहे. chase the virus and win long battle ahead असे या हिमाचल मॉडेलचे सूत्र आहे.
हिमाचल प्रदेशात डॉक्टर आणि वैद्यकीय टीमने प्रत्येक घरी जाऊन एनफ्लूएन्झा सदृष आजाराची चाचणी घेतली. त्यातून लक्षणे दिसणाऱ्यांवर तेथेच आणि अधिक लक्षणे आढळून आलेल्या पेशंटवर हॉस्पिटल, क्लिनीकमध्ये नेऊन उपचार करण्यात आले. त्यातून संपूर्ण हिमाचल प्रदेश कोरोनाला अटकाव करण्यात यशस्वी ठरले. हे मॉडेल जसेच्या तसे किंवा यात आपापल्या राज्याच्या गरजेनुसार बदल करून अमलात आणावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे.
कोविड १९ च्या विरोधात भीलवाडा आणि आग्रा मॉडेलचा बोलबाला देशभर झाला. ती मॉडेल तेथे यशस्वी ठरली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पंतप्रधानांबरोबर झालेल्या विडिओ कॉन्फरन्समध्ये हिमाचलमधील अनुभव शेअर केले. हिमाचलमध्ये १६ हजार वैद्यकीय कर्मचारी घरोघरी गेले. त्यांनी ७० लाख लोकांची एनफ्लूएन्झा लक्षणांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी १० हजार जणांना एनफ्लूएन्झाची लक्षणे आढळली. त्यांच्या पुढच्या चाचण्या घेतल्यावर १५०० जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार केले. त्यामुळे कोरोनाचे समूह संक्रमण टळले. सध्या ४० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. नवीन कोरोनाचे पेशंट राज्यात नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली.
पंतप्रधानांनी यानुसार हिमाचल मॉडेल आपापल्या राज्यांच्या गरजेनुसार रेड झोन आणि ऑरेंज झोनमध्ये अमलात आणण्याची सूचना केली. आरोग्य सेतू app वर लोकांनी स्वत:हून एनफ्लूएन्झा लक्षणांची माहिती द्यावी. राज्यांनी त्यांची तातडीने तपासणी करून उपचार करावेत. त्यातून रेड झोन आणि ऑरेंज झोनमधून संबंधित जिल्हे लवकर बाहेर पडू शकतील, अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more