राहुलबाबांना नाही महाराष्ट्रातल्या सरकारचे कौतुक

शिवसेनेसोबत आघाडी करुन सरकारमध्ये जाण्याची इच्छा ना सोनिया गांधी यांची होती ना राहुल गांधी यांची. मात्र राज्यातल्या सत्तातुर कॉंग्रेस नेत्यांच्या हट्टामुळे गांधींनी स्वतःच्या इच्छेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारचा तिय्यम सहकारी होण्यास मान्यता दिली. महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसवर असणारी राहुल गांधींची ही नाराजी कोरोना काळात देखील कमी झालेली नाही. चीनी व्हायरसविरुध्दच्या लढ्यात चांगले काम करणाऱ्या राज्यांमध्ये राहुलबााबांनी महाराष्ट्राचा उल्लेख करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. महाराष्ट्रातले महाआघाडी सरकार ते आपले मानायला तयार नाहीत, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारमध्ये कॉँग्रेसने सहभागी होण्यास माजी कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचा विरोध होता. अजूनही ते महाआघाडीचे सरकार आपले मानायला तयार नाहीत. त्यामुळे चीनी व्हायरसविरुध्द लढ्यात महाराष्ट्र सरकार करत असलेल्या कामाचे त्यांना कौतुक नाही. कॉँगेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये चांगले काम आहे म्हणताना त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख मात्र जाणून बुजून टाळला आहे.

राहूल गांधी यांनी चीनी व्हायरसच्या विरोधात उपाययोजनांत कॉँग्रेसचे शासन असलेली राज्ये आघाडीवर असल्याचे ट्विटद्वारे म्हटले आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पदुच्चेरी या राज्यांचे कौतुक केले आहे. ही राज्ये चीनी व्हायरसचा चांगल्या पध्दतीने मुकाबला करत आहेत. नवी विशेष रुग्णालये तयार केलीजात आहे. छत्तीसगडमध्ये २०० बेडचे एक रुग्णालय २० दिवसांत तयार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘जहॉँ चाह, वहॉँ राह’ असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या या ट्विटमुळे महाराष्ट्रातील कॉँग्रेस नेत्यांना मात्र तोंड लपविण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक बिकट आहे. मात्र, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करत आहे. हे राहूल गांधी यांना दिसत नाही का असा सवाल शिवसेनेकडून होत आहे. राहूल गांधी यांचा प्रथमपासूनच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यास विरोध होता. कॉँग्रेसने सत्तेत सहभागी होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. मात्र, महाराष्ट्रातील कॉँग्रेसचे आमदार फुटीच्या तयारीत असल्याचे पाहून सोनिया गांधी यांनी त्यांचा विरोध जुमानला नाही. मात्र, तेव्हापासून महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांवर राहूल गांधी खार खाऊन असल्याचेही बोलले जात आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात