योगी आदित्यनाथांबद्दल खोटे पसरविणारे ‘आप’चे आमदार अडचणीत; उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  दिल्लीतून उत्तर प्रदेशात चाललेल्या कष्टकर्‍याना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पळवून पळवून दंडुक्यांनी मारत आहेत, असे ट्विट करणारे आम आदमी पक्षाचे आमदार व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासम खास राघव चढ्ढा यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.

दिल्लीतून आपल्या गावी निघालेल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या मजुरांमुळे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोटात भीतीचा गोळा उठला आहे. आनंद विहार किंवा गाजीपूरच्या सीमेवर असलेल्या बसेस पकडण्यासाठी निघालेल्या या मजुरांवरून केजरीवाल सरकारवर टीकेची झोड उठविली जात असताना राघव चढ्ढा यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर खळबळजनक व्यक्तिगत आरोप केले. आपल्या ट्विटमध्ये चढ्ढा लिहितात, की “दिल्लीतून यूपीत निघालेल्या लोकांना योगी आदित्यनाथ हे पळवून पळवून मारत आहेत. तुम्ही दिल्लीला का गेला?, आता तुम्हा पुन्हा दिल्ली ला जाऊ देणार नाही, अशी धमकी ते लोकांना देत आहेत.”

हे ट्विट येताच उत्तर प्रदेश सरकारने त्याचे लगेचच खंडन केले आणि चढ्ढा यांच्याविरुद्ध अफवा व भीती पसरविल्याबद्दल कारवाई करण्याचे जाहीर केले. योगी यांचे माध्यम सल्लागार मृत्यूंजय कुमार म्हणाले, “अशा परिस्थितीत सुद्धा आम आदमी पक्ष घाणेरडे राजकारण खेळतोय. एवढ्या खालच्या पातळीवर येण्याची काय गरज आहे? चढ्ढा यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिस व सरकार नक्की कारवाई करेल.”

तरूण तुर्क असलेले चढ्ढा हे केजरीवालांचे खासमखास समजले जातात. पक्षाची राष्ट्रीय माध्यमांवर भूमिका मांडण्याचे काम ते करीत असतात. त्यांना मंत्री होण्याची अपेक्षा होती, पण केजरीवालांनी त्यांना संधी दिलेली नाही. 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण