म्यानमारलाही नमविले, अजित डोवाल यांची आणखी एक कामगिरी

चीनी व्हायरसच्या संकटात संपूर्ण देश असताना पाकिस्तानसारखे दहशतवादी देश आणि दहशवादी टोळ्याही सक्रीय झाल्या आहेत. मात्र, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या काळातही डोळ्यांत तेल घालून काम करत आहेत.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संकटात संपूर्ण देश असताना पाकिस्तानसारखे दहशतवादी देश आणि दहशवादी टोळ्याही सक्रीय झाल्या आहेत. मात्र, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या काळातही डोळ्यांत तेल घालून काम करत आहेत. म्यानमार देशाला २२ घुसखोरांना भारताच्या ताब्यात देण्यासाठी अजित डोवाल यांनी राजी केले आहे. भारताच्या मुत्सदेगिरीचे हे मोठे यश आहे.

म्यानमार म्हणजे पूर्वीच्या ब्रम्हदेशाची मोठी सीमा भारताला लागून आहे. इशान्येकडील अनेक राज्यांतील फुटीरतावादी घुसखोर म्यानमारमधून कारवाया करत असतात. परंतु, म्यानमारने घुसखोरांना प्रतिबंधासाठी कधीही सहकार्य केले नव्हते. ही अवघड कामगिरी डोवाल यांनी करून दाखविली आहे.

म्यानमारने आपल्या देशातील 22 घुसखोर भारताला सुपूर्द केले आहेत. हे सर्वच घुसखोर ईशान्य भारतातील सीमावर्ती भागांमध्ये सक्रीय होते. घुसखोरांना मणीपूर आणि आसामच पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे. हे सगळेच एनडीएफबी (एस), एनएनएलएफ, पीआरईपीएके (प्रो), केवायकेएल, पीएलए आणि केएलओ या प्रतिबंधित गटांचे सदस्य आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात म्यानमारच्या लष्कराने भारतीय घुसखोरांच्या विरोधात एक मोहिम चालवली होती. हे सर्वच घुसखोर म्यानमारमध्ये लपले होते. या मोहिमेला मदत करण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सुद्धा म्यानमारच्या सीमेलगत गेले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये ईस्टर्न आर्मी कमांड राहिलेले लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे (सध्याचे लष्करप्रमुख) म्हणाले होते, की म्यानमार लष्कराने वेळोवेळी ईशान्य भारतात सक्रीय असलेल्या टोळ्यांवर कारवाई केली आहे.

डोवाल यांच्याच नेतृत्वाखाली २०१६ मध्ये भारताने म्यानमारमध्ये सर्जीकल स्ट्राईक करून घुसखोरांचे तळ उध्दवस्त केले होते. डोवाल यांचे विशेष म्हणजे अगदी तरुण वयात त्यांनी इशान्य भारतात गुप्तहेर म्हणून काम केले आहे. फुटीरतावाद्यांमध्ये राहून हेरगिरी करताना एकदा लष्कराच्या कारवाईत ते मरता मरता वाचले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*