विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २१ दिवसांच्या लॉकडाऊन घोषणेचे २४ मार्चचे रात्री ८.०० वाजताचे भाषण तब्बल १९ कोटी ७० लाख लोकांनी लाइव्ह पाहिले. या बाबतीत मोदींनी आयपीएल १९ ची लोकप्रियता पिछाडीवर टाकली. ती फायनल मँच १३ कोटी ३० लाख लोकांनी लाइव्ह पाहिली होती. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सीलच्या हवाल्याने प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिशेखर वेमपती यांनी ही आकडेवारी जाहीर केली. मोदींचे ते भाषण दूरदर्शनने प्रसारित केले होते. त्याच्याकडून फीड घेत २०१ खासगी वाहिन्यांनी त्याचे लाइव्ह प्रक्षेपण केले. दूरदर्शनच्या अन्य वाहिन्यांच्या अँप, यू ट्यूब चँनलची व्ह्यूअरशीप वाढली होती. मोदींचे जनता कर्फ्यू घोषणेचे १९ मार्चचे भाषण १८ कोटी ३० लाख लोकांनी लाइव्ह पाहिले. ते १९१ वाहिन्यांनी सहक्षेपित केले होते, तर काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतरचे ५ ऑगस्ट २०१९ चे भाषण साडेसोळा कोटी लोकांनी लाइव्ह पाहिले. ते १६३ वाहिन्यांनी सहक्षेपित केले होते. ८ नोव्हेंबर २०१६ चे नोटबंदीचे मोदींचे भाषण १५ कोटी ७० लाख लोकांनी १४१ वाहिन्यांवर लाइव्ह पाहिले होते. ही सर्व आकडेवारी आयपीएल १९ च्या फायनल सामन्याच्या व्यूअरशीपपेक्षा जास्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more