भावाच्या ड्रामेबाजीवर बहिणीची वरकडी; प्रियांकांनी दिलेल्या बस नंबरच्या यादीत दुचाक्या, ऑटो, टेम्पो, ट्रकचे नंबर


विशेष प्रतिनिधी

लखनौ : स्थलांतरित मजूरांशी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत संवाद साधणाऱ्या राहुल गांधींवर प्रियांका गांधींनी वरकडी केली आहे. मजूरांच्या प्रवासासाठी काँग्रेसकडून १००० बसगाड्या देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात दुचाक्या, ऑटो, ट्रक, टेम्पो यांच्या नंबरची यादी काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारला पाठविली आहे.

स्थलांतरित मजूरांसाठी १००० बसगाड्या देण्याची ऑफर प्रियांकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिली होती. योगींनी ही ऑफर लगेच स्वीकारून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर व ठिकाणांची यादी मागितली. त्याचे नियोजन सरकारने करण्याचे आश्वासनही दिले.

प्रियांकांच्या ऑफरनंतर पहिले तीन दिवस काँग्रेसने बसगाड्यांचे नंबर आणि ठिकाणांची यादी दिली नाही. तीन दिवसांनंतर बसगाड्यांचे नंबर दिले. ही यादी उत्तर प्रदेश प्रशासनाने तपासल्यावर त्यांना यातील अनेक नंबर दुचाक्या, ऑटो, टेम्पो, ट्रकचे आढळून आले.

या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. या सर्व प्रकारात काँग्रेसच्या करणीने प्रियांका गांधींचा सेवाभाव expose झाला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण