विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात सरकारी लँबची संख्या वाढविल्याने कोरोना संशयितांच्या चाचणीची क्षमता वाढविण्यात आली असून दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचण्या घेण्यापर्यंत वाढविण्यात आली आहे. वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. प्रगत देशांच्या क्षमतेपेक्षाही ही संख्या अधिक आहे. भारतात १११ लँब कोरोना चाचण्यांसाठी कार्यरत आहेत. फ्रान्समध्ये दर आठवड्याला १० हजार, तर ब्रिटनमध्ये १६ हजार जणांच्या चाचणीची क्षमता आहे. अमेरिकेत २४ हजार, जर्मनीत ४२ हजार तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीत ५२ हजार जणांच्या चाचणीची क्षमता विकसित करण्यात आली आहे. भारतात खासगी लँबलाही चाचणीची क्षमता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या खासगी लँबची देशात 15 हजार केंद्र आहेत. शिवाय 111 सरकारी संस्था मध्ये ही सुविधा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more