बॉलीवुड म्हणते, म्हणूनच नरेंद्र मोदी आमचे नेते

चीनी व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे बॉलीवुडमधील कलाकारांनी स्वागत केले आहे. पंतप्रधानांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच ते आमचे नेते आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : चीनी व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे बॉलीवुडमधील कलाकारांनी स्वागत केले आहे.

पंतप्रधानांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच ते आमचे नेते आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर म्हणतात, जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा केवळ देशच नव्हे तर संपूर्ण जग त्यांचे ऐकत असते आणि प्रेरणा घेत असते. १३० कोटी भारतीय आपल्या हातात आत्मनिर्भरतेची चावी घेऊन काम करू लागले तर यश नक्कीच आमच्या पायाशी असेल.

प्रसिध्द अभिनेता शाहीद कपूर म्हणतो, पंतप्रधानांचे भाषण फारच जोरदार आणि प्रेरणादायी होते. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल म्हणाले, नरेंद्र मोदीजी यांच्यावर नेहमीच भरोसा ठेवला आहे. ते संकटातून नक्कीच रस्ता काढतात किंवा शोधतात.

अभिनेता अर्जून रामपाल म्हणतो, २० लाख कोटींचे पॅकेज शानदारच आहे. या काळात याची फार गरज होती. म्हणूनच ते आमचे नेते आहे. या अनिश्चिततेच्या काळात ही मोठी बातमी आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*