बिगर मुस्लीमांना “नापास” करणारा प्रोफेसर निलंबित; जामिया मिलिया विद्यापीठाला कारवाईची उपरती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीएएचे समर्थन करणारे १५ बिगर मुस्लीम विद्यार्थी सोडून ५५ मुस्लीम विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे, अशा आशयाचे ट्विट करणारा प्रोफेसर अब्रार अहमदवर जामिया मिलिया विद्यापीठाने निलंबनाचा बडगा उगारला आहे. हा बडगा उगारताच अब्रार अहमदने दुसरे ट्विट करून आपण व्यंगोक्ती करणारे ट्विट करून घटनेपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. १५ बिगर मुस्लीम विद्यार्थी नापास तर ५५ मुस्लीम विद्यार्थी पास झाल्याचे ट्विट अहमदने २५ मार्चला केले होते. तर कारवाईच्या बडग्यानंतर त्याने सारवासारव करणारो ट्विट केले. त्यात तो म्हणतो, विद्यार्थी भेदभाव मी केला नाही. मूळात अशी कोणतीच परीक्षाही झालेली नाही. सीएएचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मी फक्त विनोदी टिपण्णी केली होती. तरीही विद्यापीठाने अहमद यांच्यावर निलंबनाची नोटीस बजावली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय