सागर कारंडे
नवी दिल्ली : पीएमकेअर निधीची (पीएम सिटीझन्स असिस्टन्स अँड रिलीफ इन ईमर्जन्सी सिच्युएशन्स) माहिती ही माहिती अधिकारामध्ये (आरटीआय) बसत नाही, असे स्पष्ट करीत पंतप्रधान कार्यालयाने पीएमकेअरबद्दल माहिती देण्यास नकार दिल्याचे वृत्त प्रकाशित झाले आणि त्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूवर संशय घेणारी टीका टिप्पणी सोशल मीडियावर चालू झाली. पीएमकेअर ही पब्लिक अॅथाॅरिटी नसल्याचे कारण देत माहिती नाकारण्यात आल्याचेही बातमीत नमूद केले गेले.
खरोखरीच मोदी हे पीएमकेअरबद्दल माहिती दडवीत आहेत? खरोखरच त्यामागे त्यांचा या निधीतील रकमेचा गैरवापर करण्याचा हेतू आहे? कॅगमार्फत लेखा परीक्षण का नाही? त्यास माहिती अधिकार का लागू होत नाही त्यास माहिती अधिकार का लागू होत नाही? आणि त्यापलीकडे जाऊन भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला पंतप्रधान नैसर्गिक आपत्ती निधी (पीएमएनआरएफ) अस्तित्वात असताना मग हा नवा पीएमकेअर निधी कशासाठी? असे प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहिले आहेत किंवा काही प्रमाणात ते उभे केले जात आहेत! विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने सर्व आक्षेप फेटाळले असतानाही त्याबद्दल शंका-कुशंका निर्माण केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर पीएमएनआरएफ, पीएमकेअर आदींच्या निर्मितीचा हेतू, व्यवस्थापन, अधिकार या आधारे आक्षेपांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न दहा मुख्य मुद्द्यांच्या आधारे करू यात…
पीएमकेअर नेमके असे आहे…
सर्वांत महत्वाचे, केवळ पीएमएनआरएफ किंवा पीएमरेअर नव्हेच, सर्व राज्यांमधील मुख्यमंत्री सहायता निधी हे देखील पंतप्रधानांच्या या दोन संस्थांच्या धर्तीवर धर्मादाय संस्था (पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) आहेत. ते त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे विशेषाधिकार आहेत. त्याचे लेखा परीक्षण कॅगमार्फत होत नाही. त्यांना आरटीआय लागू होत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more