पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कुबेरांनी मोकळ्या केल्या थैल्या


कोरोनाविरुध्द लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला  आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपले  योगदान देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्यानंतर पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

अभिजीत विश्वनाथ 
कोरोनाविरुध्द लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला  आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपले  योगदान देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्यानंतर पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांनी तब्बल १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहूल बजाज यांनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. जयहिंद ग्रुप आणि फोर्स मोटर्स यांच्यातर्फे अभय फिरोदिया यांनी २५ कोटी रुपयांची मदत दिली आहे.
प्रसिध्द अभिनेते अक्षय कुमार यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले आहे. ट्विीट करून त्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांनी रिट्टि करून त्यांना धन्यवाद दिले आहेत. बाहुबलीफेम प्रसिध्द अभिनेता प्रभास याने चार कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. अभिनेता वरुण धवन याने ३० लाख रुपये दिले आहेत. रामचरण तेजा यांनी ७० लाख रुपये दिले आहे.
प्रसिध्द क्रिकेटपटू सुरेश रैना याने ५२ लाख रुपयांची मदत जाहीर केलीआहे. यापैकी ३१ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आंणि २१ लाख रुपये उत्तर प्रदेश मुख्यमंत्री निधीसाठी दिेणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शहा आणि पदाधिकाºयांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५१ कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
प्रशासकीय  अधिकाºयांच्या आयएएस असोसिएनने २१ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय असोसिएशनचा प्रत्येक सदस्य कमीत कमी एक दिवसाचे वेतन देणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदारांनी आपल्या खासदार निधीतून प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी खासदारांना आवाहन केले होते. लोकसभेत भाजपाचे ३०३ आणि राज्यसभेत ८३ सदस्य आहेत. त्यांच्याकडील एकूण निधी ३८६ कोटी रुपये होणार  आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की अगदी छोट्यात छोटी रक्कमही या सहाय्यता निधीसाठी दान केली जाऊ शकते. आपल्या क्षमतेनुसार नागरिकांनी दान करावे. या निधीचा उपयोग पुढील दिवसांत कोरोनामुळे आलेल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी केले जाणार आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्वीट करून जास्तीत जास्त नागरिकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदतीचे आवाहन केले आहे. गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की संकटाच्या प्रसंगी एकत्र येण्याचा आदर्श भारतीयांनी नेहमीच जगाला दिला आहे. त्यामुळे कोरोना विरुध्दच्या लढाईत सर्वांनी एकत्र यायला हवे. परस्परांना सहकार्य करायला हवे. प्रत्येकाचे योगदान मौल्यवान असणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण