नको नको म्हणतच कोरोनाचे राजकारण; निरंजन डावखरे – रोहित पवार यांची जुंपली


 विशेष प्रतिनिधी

 मुंबई  :  नको नको म्हणतच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या फैलावाचे राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण जनता कर्फ्यू पाळू या, असे देवेंद्र फडणवीस म्हणत असतानाच दुसरीकडे मात्र आजच्या संकटकाळात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे होते, असे तारे आमदार निरंजन डावखरे यांनी उगाच तोडले. ते नेटीझन्सच्या रडारवर आले. सगळीकडून त्यांच्यावर भडीमार झाला. वास्तविक पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे ज्या प्रगल्भतेने आणि संयमाने कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळताहेत, त्याची महाराष्ट्रभर प्रशंसाच होते आहे. अशा वेळी आज फडणवीस हवेत, असे म्हणून औचित्यभंग करण्याची निरंजन डावखरे यांना गरजही नव्हती. खुद्द फडणवीसही तसे म्हणणार नाहीत. त्यावरच नेटीझन्सनी नेमके बोट ठेवले. अर्थात यालाही १२-१५ उलटून गेले. त्यानंतर बर्याच गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड झाल्या. पण आमदार रोहित पवारांनी डावखरेंचा विषय पुन्हा उकरून काढला. कोरोना हा राजकारण करण्याचा विषय नाही. राजकारण घरात क्वारंटाइन करा, अशी टिपण्णी रोहित पवारांनी केली. रोहित पवारांना देखील औचित्य उरले नसल्याचे हे लक्षण आहे. डावखरेंना उपदेश करता करता स्वत: रोहित पवारच अशी टिपण्णी करून राजकारण करताहेत, याचे भानही त्यांना उरलेले नाही.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात